Ads

Ads Area

मिरवणूक मुक्त सोलापूर सोबतच द्वेष मुक्त सोलापूर बनवा - डॉ.रफिक सैय्यद

 मिरवणूक मुक्त सोलापूर सोबतच द्वेष मुक्त सोलापूर बनवा - डॉ.रफिक सैय्यद

सोलापूरला गतवैभव मिळवुन देण्यासाठी कटिबद्ध - सोलापूर विकास मंच

 सोलापूर(कटूसत्य वृत्त):- मावा, मटका, मिरवणूक, गांजा, गुंडगिरी, हातभट्टी, व्याजबट्टा, अमली ड्रग्ज निर्मितीचा अड्डा, शहर विदृपिकरण करणारे टोलेजंग डिजिटल फ्लेक्स बॅनर्स, अवैध प्रवासी आणि माल वाहतूक ह्या अश्या अनेक नकारात्मक गोष्टींचा सोलापूरात अतिरेक वाढत असुन ह्या सर्व अनाधिकृत बेकायदेशीर कृत्यांवर संबंधित प्रशासकीय विभागाच्या वतीने ठोस कारवाई करण्यासाठी जनरेटा अतिशय महत्त्वाचा असल्याचे मत सोलापूर विकास मंच द्वारा अंत्रोळीकर नगर येथील पुष्पस्नेह लॉन्स येथे आयोजित अनौपचारिक बैठकीत उपस्थित सदस्यांनी व्यक्त केले. सोलापूर शहराला जोडणाऱ्या आठ राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर शहरात परगावाहुन येणाऱ्या सर्व कागदपत्रे असुनही शहर वाहतूक शाखेच्या वतीने होणार्‍या मानसिक आर्थिक लुटीमुळे सोलापूरची इतर राज्यात प्रतिमा अतिशय खराब होऊन त्याचा फटका सोलापूरच्या पर्यटनावर नकारात्मक  झाला असुन ज्याचा सोलापूरकरांना करोडो रुपयांचा अर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

सोलापूरची पूर्वी गिरणगाव, मॅंचेस्टर अॉफ इस्ट, हँडलुम, पॉवरलुम, टेक्स्टाईल, वस्त्रोद्योग, ज्वारीचे कोठार, इत्यादी क्षेत्रात अव्वल, अग्रगण्य आणि सकारात्मक ओळख होती. पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, हत्तरसंग कुडल, संतनगरी मंगळवेढा ह्या तीर्थक्षेत्रांमुळे सोलापूरचा तीर्थक्षेत्र कॉरिडॉरमध्ये समावेश करुन ओळख निर्माण करुन व्यापक प्रमाणात देशा विदेशात प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्याचे मत उपस्थित सदस्यांनी व्यक्त केला. जुळे सोलापूर आणि हद्दवाढ भागाचा सोलापूर महानगरपालिकेत समावेश करुन कैक दशक होऊनही इथल्या नागरिकांना अजुनही मुलभूत नागरी सोयीसुविधां पासुन वंचित राहावे लागत असल्याची खंत ह्यावेळी व्यक्त करण्यात आली. सोलापूरात मोठे उद्योग आणि व्यावसाय नसल्याने इथल्या तरुणांना नोकरीसाठी नाईलाजाने कायमस्वरूपी सोलापूर सोडून जावे लागले, त्यांना सोलापूरात पुन्हा एकदा स्थिर स्वरुपात वसवण्यासाठी सोलापूर विकास मंच कटिबद्ध असुन सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्त्वपूर्ण विषय सातत्यपूर्ण आणि अभ्यासपूर्णपणे प्रशासकीय पातळीवरुन सोडवण्यासाठी सोलापूर विकास मंच कटिबद्ध असल्याचा ठाम विश्वास सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी उपस्थितांसमोर व्यक्त केला.

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर तथा संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रफिक सय्यद यांनी सोलापूरात सोलापूर विकास मंचच्या माध्यमातून बुध्दीमान लोक शहर आणि समाजाच्या विकासासाठी जात धर्म बाजुला सारून निस्वार्थपणे केवळ सोलापूरच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करताना पाहुन आनंद होत असुन त्यांच्या कार्याची प्रेरणा संपूर्ण भारतातील इतर शहरांनी घ्यावी तसेच नवीन वर्षांनिमित्त सोलापूरकरांनी द्वेषमुक्त सोलापूरचा निर्धार करण्याचा संकल्पर मार्गदर्शन केले. सोलापूर विकास मंचच्या वतीने सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टीने तसेच इथल्या नागरिकांना भेडसावणारे सर्व मुलभूत प्रश्न लोकप्रतिनिधी, केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनाकडून सातत्यपूर्ण आणि अभ्यासपूर्णपणे सोडविण्यासाठी आणि निर्णायक ठोस कारवाई करुन घेऊन सोलापूरला गतवैभव मिळवुन देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी दिली. ह्यावेळी मिलिंद भोसले, योगिन गुर्जर, केतन शहा, आनंद पाटील, अनंत कुलकर्णी, अॅड.दत्तात्रय अंबुरे, मनोज क्षीरसागर, अर्जुन रामगिर, इक्बाल हुंडेकरी, बाळासाहेब मोरे, शिवाजी उपरे, रमेश माळवे, सुनिल उपरे, प्रसन्न नाझरे, सारंग तारे, गणेश शिलेदार, सुधीर क्षीरसागर, लालनाथ चव्हाण, कुमार क्षीरसागर, श्रीनिवास पोट्टाबत्ती, श्रीकांत बनसोडे, शाफुर काझी, डॉ. आर.जी. सय्यद, जयसिंग बोरनडे, डॉ. रफिक सय्यद, मोहम्मद करिम, कैलास लांडे, ए.एन. पाटील, विजयराज बाहेती, विशाल कर्णेकर, विजय कुंदन जाधव आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते. सदर बैठकीस पुष्पस्नेह लॉन्सचे अध्यक्ष पर्यावरणप्रेमी उद्योगजक प्रल्हाद काशीद यांचे विषेश सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close