Hot Posts

6/recent/ticker-posts

मराठा आरक्षणाचा तिढा सोडविल्याशिवाय सरकारने कोणतीही शासकीय नोकर भरती करू नये - संभाजी ब्रिगेड....

 मराठा आरक्षणाचा तिढा सोडविल्याशिवाय सरकारने कोणतीही शासकीय नोकर भरती करू नये - संभाजी ब्रिगेड....



हिवाळी अधिवेशनात आरक्षणाचा तिढा सोडवावा - मुंबई अध्यक्ष सुहास राणे

टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-  महाराष्ट्र शासन राज्य क्रीडा आणि युवक संचालनालय विभागाने जिल्हा आणि तालुका स्तरीय क्रीडा विभागात क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक लघुलेखक, शिपाई आदी विविध पदांची होणारी भरती मराठा आरक्षणाचा निकाल लागल्यानंतर करावी यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय क्रीडा मंत्री, सामान्य प्रशासन विभागाला दिनांक १६ नोव्हेंबर रोजी निवेदन दिले. जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा विद्यमान सरकार सोडवत नाही, तसा अंतिम शासन निर्णय घेत नाही. तोपर्यंत क्रीडा विभाग तसेच इतर कोणत्याही विभागात शासकीय नोकऱ्यांची पद भरती करू नये अशी संभाजी ब्रिगेड पक्षाचे मुंबई अध्यक्ष सुहास राणे यांनी पत्रकार शी बोलताना सांगितले आहे
       पुढे ते म्हणाले की, सद्या महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात आमरण उपोषण, साखळी उपोषण, विविध प्रकारे आंदोलने चालू आहेत. त्यांनी महाराष्ट्र सरकारला २४ डिसेंबर २०२३ पर्यंतचा (दोन महिन्याचा) अल्टीमेटम दिलेला आहे. याबाबत शिंदे सरकारअंतिम निर्णय काय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे मराठा आरक्षणाबरोबरच धनगर आरक्षणाचाही मुद्दा उपस्थित झालेला आहे. ओ.बी.सी. मध्येही मतभेद निर्माण झालेले आहे. अशातच महाराष्ट्र राज्य क्रीडा आणि युवक संचालनालय विभागाने जिल्हा तालुका स्तरावर नोकर भरती करण्याचे महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा विभागाने ठरविलेले आहे.         
महाराष्ट्र शासनाने नोकर भरतीबाबतची जाहिरात क्रीडा व युवक सेवा संचालनालयच्या संकेतस्थळावर दिली होती. अर्ज प्रक्रिया सुरुवात दिनांक २२ जुलै २०२३ ते अंतिम दिनांक १० ऑगस्ट २०२३ अशी ठेवण्यात आली होती.
Reactions

Post a Comment

0 Comments