Hot Posts

6/recent/ticker-posts

24 डिसेंबर ला सरकारने आरक्षण न दिल्यास "गाव तेथे साखळी उपोषण" सुरू करण्याचा जरांगे पाटलांनी दिला सकल मराठा बांधवांना आदेश...!

 24 डिसेंबर ला सरकारने आरक्षण न दिल्यास "गाव तेथे साखळी उपोषण" सुरू करण्याचा जरांगे पाटलांनी दिला सकल मराठा बांधवांना आदेश...! 


सोलापूर (कटूसत्य वृत्त): - ज्या ज्या राजकीय नेत्यांना आपण मोठे केलं. तेच राजकीय नेते आज आपल्या मुलांच्या पदरात आरक्षणाचं दान पडत असताना तोंडावर बोट ठेवून बसत असतील तर त्यांना इथून पुढे गुलाल उधळायला संधी द्यायची नाही.
एवढेच नव्हे तर जो आपल्या मदतीला तोच इथून पुढे आपला..
स्वतःच्या लेकराच्या आरक्षणासाठी सर्व माता भगिनी आणि बांधवांनी एकत्र यावे कारण अशी संधी पुन्हा येणार नाही आलेल्या संधीचं सोनं करा.
सरकारने हे आंदोलन दडपण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला परंतु सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर आता आपलीच माणसं आपल्यावर सोडण्याचा सरकारकडून शेवटचा प्रयत्न होण्याची शक्यता असल्यामुळे मतभेद होऊ न देता एकजूटने हा लढा पुढे नेऊया जीवात जीव असेपर्यंत मी एक इंचभर ही मागे हटणार नाही. मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. असा इशारा पुन्हा जरांगे पाटील यांनी दौंड तालुक्यातील वरवंड या ठिकाणी झालेल्या जाहीर सभेत दिला आहे.
या जाहीर सभेला लाखो मराठा समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी एक मराठा कोट मराठा अशा गगनभेदी घोषणा समाज बांधवांनी देऊन वातावरण दुमदुमून सोडले.



Reactions

Post a Comment

0 Comments