*टेंभुर्णी सरपंचपदी सुरजा बोबडे यांची निवड
*नाना-भैय्या यांच्या जनपरिवर्तन पॅनलने सहा जागा जिंकून बाजी मारली
*तर सत्ताधारी कुटे गटाचा धुव्वा उडाला आहे
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अतिशय चुरसीने झालेल्या तिरंगी निवडणुकीत सुरजा योगेश बोबडे यांनी बाजी मारली असून त्या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या असून बोबडे गटाचेच दहा ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्याने ग्रामपंचायतवर बोबडे गटाची निर्विवाद सत्ता स्थापन झाली आहे.तसेच रावसाहेब देशमुख व सुरज देशमुख यांच्या आघाडीने ही सहा जागा जिंकून निवडणुकीत हम भी किसीसे कमी नही हे दाखवून दिले आहे.तर सत्ताधारी कुटे पार्टीचा धुव्वा उडाला असून माजी सरपंच प्रमोद कुटे हे कसेबसे निवडून आले आहेत. टेंभुर्णी ग्रामपंचायत निवडणूक अनेक अर्थाने महत्वपूर्ण ठरली असून अनेक वर्षे आमदार बबनराव शिंदे यांचे समर्थक कुटे गटाची टेंभुर्णी ग्रामपंचायतवर सलग सत्ता होती.मागील निवडणुकीत बोबडे गटाचे दहा सदस्य निवडून येऊन ही सरपंचपद न आल्याने त्यांना सत्तेने हुलकवणी दिली होती.
या निवडणुकीत बोबडे गटाच्या सरपंचपदासाठी निवडून आलेल्या सुरजा बोबडे या सर्वसाधारण खुल्या गटातून तब्बल १३५० मतांनी विजयी झाल्या आहेत.लोकनेते कृष्णात बोबडे विकास आघाडीचे प्रभाग-१मधील विजयी उमेदवार कैलास भिकाजी सातपुते,नागनाथ सोपान वाघे,शामल तुकाराम डोके,प्रभाग-३ मधून राजश्री सतीस नेवसे,मुक्ताबाई गुरलिंग पाटील,प्रभाग-४ मधून ऋषिकेश मोहन बोबडे,सुनंदा सिद्धेश्वर ताबे,प्रभाग-५ मधून बाळासो अजिनाथ ढगे,प्रभाग-६ मधून आरती लखन पवार,अमर महादेव कांबळे हे दहा सदस्य निवडून आले. रावसाहेब देशमुख व सुरज देशमुख यांच्या जनपरिवर्तन विकास पॅनलचे प्रभाग-२ मधून लखन विजय हवालदार,विद्या शैलेश ओहोळ,रुपमती राजाराम थोरात,प्रभाग -४ मधून सचिन नीलकंठ होदाडे तर प्रभाग-५ मधून सईबाई वैभव महाडिक,प्रतिभा परमेश्वर खरात असे सहा सदस्य निवडून आले.तर प्रभाग सहा मधून कुटे गटाचे उमेदवार तथा मावळते सरपंच प्रमोद कुटे हे एकमेव सदस्य निवडून आले आहेत.या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते मयूर अजिनाथ काळे यांनी स्वावलंबी पॅनलच्या माध्यमातून सरपंचपदासह नऊ ठिकाणी सदस्यपदासाठी उमेदवार उभे केले होते पण त्यास यश आले नाही.या निवडणुकीत १५ हजार ४३३ मतदारांपैकी ११ हजार ७ ४५ मतदारांनी (७६.१० टक्के) मतदान केले होते.
बोबडे गटाचे प्रमुख योगेश बोबडे सर्व विजयी सदस्य व जनपरिवर्तन पॅनलच्या नाना-भैय्या गटाच्या पार्टी प्रमुख रावसाहेब देशमुख,सुरज देशमुख विजयी सदस्यांच्या फटाके वाजवून गुलालाची मुक्त उधळण करीत मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
0 Comments