रोपळे(कव्हे)ग्रामपंचायत निवडणूकीत मोहिते पाटील गटाचा पराभव
आमदार संजय शिंदे गटाला पंसती टेभुर्णीत कमळ फुलले,तालुक्यातील
अनेक गावात सत्ता परिवर्तनाचा कित्ता
माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील १४ ग्रामपंचायत च्या सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामीण भागातील नागरिकांनी सत्ता परिवर्तन घडवले आहे.माढा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची आणी सर्वात मोठी असलेल्या टेंभुर्णी ग्रामपंचायत निवडणुकीत अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे गटाला जोरदार धक्का बसला आहे. भाजपाने टेंभुर्णी ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करुन भाजपचा झेंडा फडकावला आहे. अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदेना ६ ,काॅग्रेसचे माजी आमदार अॅड.धनाजीराव साठे गटास २,तर शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजीराव सावंत गटास २ ग्रामपंचायत मिळाल्या आहेत. लक्ष वेधी ठरलेल्या रोपळे (कव्हे) ग्रामपंचायत मध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील गटास मतदारांनी नाकारुन आमदार संजय शिंदे गटाला पंसती दिली आहे.माढा तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीमध्ये सत्ता परिवर्तन घडले आहे. जुन्या कारभार्याना राम राम ठोकून नवे गावकारभारी निवडले आहेत.माढ्यातील शासकीय धान्य गोदामात सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरूवात झाली.प्रभागनिहाय मतमोजणी केल्याने निकाल ऐकण्यासाठी आलेल्या नागरिकांना अनेक वेळ वाट पाहत ताटकळत बसावे लागले.टेंभुर्णी ग्रामपंचायत भाजपाचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, यांच्या पॅनलने सरपंच पदासह दहा जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला.कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष ॠषिकेश बोबडे हे भाजपाचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांच्या पॅनल मधून विजयी झाले आहेत.दोन्ही पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी टेभुर्णीवर सत्ता आणल्याचे चित्र स्पष्ट झाले.विद्यमान सत्ताधारी आमदार शिंदे च्या प्रमोद कुटे पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.नव्याने टेंभुर्णीच्या राजकारणात शिरकाव केलेल्या रावसाहेब देशमुख यांच्या पॅनलने सहा जागा जिंकत ताकद दाखवुन दिली आहे.पिंपळनेर ग्रामपंचायतीमध्ये माजी जि.प.सदस्य संजय डांगे यांच्या पॅनलने सरपंच पदासह दहा जागा जिंकत सत्तापरिवर्तन घडवले.सतीश पाटील गटास केवळ ३ जागा मिळाल्या आहेत.जय पराजय झालेले पॅनल प्रमुख आमदार शिंदे समर्थक आहेत.
रोपळे (कव्हे) ग्रामपंचायत निवडणूकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील समर्थक तात्या गोडगे गटाला पराभव स्विकारावा लागला.आमदार संजयमामा शिंदे समर्थक गोडगे दळवी पॅनलने सरपंचपदासह सात जागा जिंकून विजय मिळवला.पिंपळखुंटे ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचे विजयसिंह पाटील यांच्या गटाने सरपंचपदासह सहा जागा जिंकल्या आहेत.तर विरोधातील युवराज पाटील व पवन पाटील गटास केवळ ३ जागा मिळाल्या.
अंजनगाव (खेलोबा) ग्रामपंचायत वर आमदार बबनराव शिंदे समर्थक प्रदीप चौगुले व भागवत चौगुले यांनी सत्ता अबाधित ठेवली.सरपंचपदासह सात जागा जिंकत विरोधातील आप्पाराव वाघमोडे व इंगळे गटाचा पराभव केला. वडशिंगे ग्रामपंचायत निवडणूकीत शिवसेनेचे बापुसाहेब जाधव,काॅंग्रेसचे रोहिदास कदम,राष्ट्रवादीचे उदयसिंह कदम व विजयकुमार कदम या चौघांनी एकत्रित उभा केलेल्या मविआ च्या पॅनलला सरपंचपदासह ७ जागा तर संदीप पाटील यांच्या स्वाभिमानी ग्रामविकास आघाडीने २ जागा जिंकल्या.गावातील सर्वच प्रस्थापित नेतेमंडळी एकत्र आल्यानंतर देखील संदीप पाटील गटाने दिलेली लढत प्रस्थापितांना विचार करणारी ठरली आहे.
वडोली ग्रामपंचायत शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत गटाचे माजी सरपंच तानाजी गाडे यांनी सरपंच पदासह चार जागा जिंकून तर विरोधी आमदार शिंदे गटास केवळ ३ जागा मिळाल्या.अंबाड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारत गाडे यांना ६ जागा मिळाल्या मात्र विरोधी गटाचे ३ सदस्य व सरपंचपदी विजयी झालेत. कन्हेरगांव ग्रामपंचायत मध्ये लिंबाजी मोरे यांच्या पॅनलने सरपंचपदासह ९ जागा जिंकल्या आहेत तर
आमदार संजय शिंदे समर्थक धनंजय मोरे गटास तीन जागा मिळाल्या. चांदज ग्रामपंचायत निवडणूकीत शिवाजी पाटील चांदजकर यांच्या गटास ९ पैकी ६ जागा मिळाल्या परंतु पाटील गटाचा सरपंचपदाचा उमेदवार पराभूत झाला. जय हनुमान ग्रामविकास पॅनलने ३ जागा घेत सरपंच पद मिळवले.मुंगशी ग्रामपंचायत निवडणूकीत काॅग्रेसचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.सुर्यकांत महाडिक यांच्या नेतृत्वाखालील गटाने सर्वच्या सर्व जागा जिंकत आमदार संजय शिंदे पॅनल पराभूत केला.तुळशी ग्रामपंचायत निवडणूकीत माळी मोरे पॅनलने सरपंचपदासह सात जागा जिंकल्या तर विरोधी प्रमोद वसेकर गटास सहा जागा मिळाल्या आहेत.
------------------------------ -----------------
निवडून आलेले सरपंच व कंसात पक्ष
------------------------------ ---------------
कन्हेरगाव -श्रीकांत निवृत्ती बनसोडे( राष्ट्रवादी)
अंबाड.-बाळासाहेब नागनाथ कुर्डे( अजित पवार राष्ट्रवादी आमदार बबनराव शिंदे)
मुंगशी --- कमल सुर्यकांत महाडिक(काॅग्रेस)
लोणी -नाडी - बापूसाहेब खरात(अजित पवार राष्ट्रवादी)
तुळशी -डॉ शरद किसन मोरे(अजित पवार राष्ट्रवादी)
वडोली -तानाजी विठ्ठल गाडे(एकनाथ शिंदे- शिवसेना)
चांदज -शोभा बळीराम टकले(एकनाथ शिंदे शिवसेना व भाजपा)
टेंभुर्णी - सुरजा योगेश बोबडे(भाजपा)
वडशिंगे -दत्तात्रय यशवंत जाधव(सर्वपक्षीय)
अंजनगाव खे -अरुणा प्रदीप चौगुले(अजित पवार राष्ट्रवादी)
पिंपळखुंटे -प्रतिक्षा विजयसिंह पाटील(काॅग्रेस)
पिंपळनेर -अनुजा संजय डांगे(अजित पवार राष्ट्रवादी)
आढेगाव -कांतीलाल बापूराव टेळे(सर्वपक्षीय)
रोपळे कव्हे -लक्ष्मण नागनाथ लोंढे(अजित पवार राष्ट्रवादी)
वेणेगाव-तानाजी कदम (एकनाथ शिंदे शिवसेना प्रा.शिवाजीराव सावंत)
0 Comments