जनतेची दिशाभूल करणाऱ्या भाजपला काँग्रेस कार्यकर्त्यांनी सडेतोड उत्तर द्यावे- सुशीलकुमार शिंदे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसीय "संकल्प सिद्धि -२०२४ प्रशिक्षण शिबिर शनिवार व रविवार दिनांक २५ व २६ नोव्हेंबर २०२३ रोजी काँग्रेस भवन सोलापुर येथे आयोजित होते. या शिबिराचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते शहर अध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, जिल्हा अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री शहर कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, महिला अध्यक्षा प्रमिलाताई तुपलवंडे, माजी महापौर अलकाताई राठोड, सुशिलाताई आबूटे, आरिफ शेख, प्रवक्ते अशोक निंबर्गी, रियाज हुंडेक़री, शिवा बाटलीवाला, नरसिंग कोळी, विनोद भोसले, वैष्णवीताई करगुळे, परवीन इनामदार, अनुराधा काटकर, गणेश डोंगरे, जुबेर कुरेशी, भीमाशंकर टेकाळे, उमेश सूरते, मनीष गडदे, अंबादास बाबा करगुळे, प्रवक्ते नागनाथ कदम, देविदास गायकवाड़, बाबूराव म्हेत्रे, उदयशंकर चाकोते, लक्ष्मीकांत साका, अरुण साठे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे साहेब म्हणाले की, सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी नव्या चिंतनाची भूमिका स्वीकारुन काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे घेण्याचे ठरवले असून त्यांच्याच एक भाग म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्याकडून लोकायत संघटनेच्या नीरज जैन आणि त्यांच्या टीम उदय देशमुख, स्नेहल बाळकृष्ण शुभांगी, निश्चय साक्षात साधना यांच्या वतीने आज प्रशिक्षण शिबिर होत आहे. काँग्रेस पक्षाने सत्तर वर्षात काय केले म्हणून भाजप नव्या पिढीला पद्धतशीरपणे दिशाभूल करते. म्हणून काँग्रेस पक्षाची माहिती जनतेमध्ये जाऊन सांगण्यासाठी काँग्रेसचा खरा इतिहास, विचार, धोरण, स्वातंत्र्यलढयातील योगदान, बलिदान त्याग, आणि केलेले विकासकामे आदिंची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे या प्रशिक्षणामुळे काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते विचाराने समृद्ध होऊन जनतेला आणि नव्या पिढीला काँग्रेसचे विचार धोरण चांगल्या प्रकारे पटवून देऊ शकतील.
यावेळी मार्गदर्शन करताना लोकायत संघटनेचे प्रशिक्षक नीरज जैन म्हणाले की, ब्रिटीशांना या देशातुन हाकलल्यानंतर काँग्रेसने या देशाचा सर्वच क्षेत्रात चाैफेर विकास केलाय. काम केले म्हणूनच या देशातील जनतेने ७० वर्षे देशाची सत्ता काँग्रेसला दिली. देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी व मिळाल्यानंतरही काँग्रेसचा सर्वसमावेशक विचार देशाप्रती समर्पित राहिला आहे. हा विचार अखंडपणे व प्राणपणाने जपण्याचे कार्य काँग्रेस नेत्यांनी मोठ्या हिंमतीने निभावले आहे. भाजपच्या धर्मांध आणि विभाजनवादी अजेंड्याला राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव वाढवणारा काँग्रेस विचारच रोखू शकतो. काँग्रेस पक्ष हा नेहमी महिलांचा सन्मान करणारा असून देशाला प्रथम महिला पंतप्रधान काँग्रेसने दिला. महिलांच्या सक्षमी करणासाठी काँग्रेसने नेहमीच पुढाकार घेतला. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण काँग्रेसनेच दिला असल्याचे यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड केशव इंगळे यांनी केले होते.
0 Comments