मोहोळ तालुक्यातील दोन ग्रामीण मार्गांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर :- आ.यशवंत माने
देगाव -बोपले -एकुरके ते नरखेड यावली ते खवणी मार्गांचा समावेश
मोहोळ (कटूसत्य वृत्त):-येत्या वर्षभरात मोहोळ मतदार संघातील कानाकोपऱ्यातील ग्रामीण भागातील सर्व रस्ते अद्यावत होऊन दळणवळणाच्या विकास प्रक्रियेला गती येईल. शहर आणि ग्रामीण भाग अद्यावत रस्त्याने जोडल्यास त्याचा मोठा फायदा शेती आणि भाजीपाल्याच्या वाहतुकीला होणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांची ही सोय होणार आहे.मोहोळ मतदारसंघात ३०५४(शासनस्तर गट ब)योजने अंतर्गत दोन कोटीचा निधी मंजूर झाला असून येत्या काळात आणखी मोठ्या प्रमाणात रस्ते विकासासाठी निधी खेचून आणू असा विश्वास मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी व्यक्त केला.राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, यांच्या सहकार्याने व माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार यशवंत(तात्या)माने यांनी केलेल्या अविरत पाठपुराव्यामुळे मोहोळ तालुक्यात ३०५४ या योजने अंतर्गत दोन कोटीचा निधी मंजूर झाला आहे. दोन कोटी रुपयांचा निधी मिळालेल्या रस्त्यामध्ये देगाव -बोपले -एकुरके ते नरखेड(नरखेड ते मानेगाव रस्ता ते बोपले) या मार्गासाठी १ कोटी २० लाख तर यावली ते खवणी रस्त्यासाठी मोहोळ ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या विशेष सहकार्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये रस्ते विकासासाठी निधी खेचून आणण्यामध्ये मोहोळ मतदारसंघाचा सातत्याने वरचा क्रमांक लागतो. राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार यशवंत माने यांनी गत चार वर्षांमध्ये बाराशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी खेचून आणत मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. आता आणलेल्या दोन कोटी रुपयांच्या निधीमुळे रस्ते सुविधांपासून वंचित असलेल्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेस दिलासा मिळणार आहे.
अजिंक्यराणा पाटील
सिनेट सदस्य सोलापुर
0 Comments