Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूर न्यायालयामध्ये संविधान दिन साजरा

 पंढरपूर न्यायालयामध्ये संविधान दिन साजरा

 

          पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा न्यायालय, पंढरपूर येथे एम. बी. लंबे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली व अधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा करण्यात आला

.

            या कार्यक्रमास संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे प्रतिमापुजन करुन कार्यक्रमास सुरुवात केली. पुणे येथील विधीज्ञ पांडुरंग थोरवे, माजी अध्यक्ष पुणे बार असोसिएशन यांनी मोजणी व मोजणी निगडीत असणाऱ्या कायद्यातील तरतुदी या विषयावर सर्वांना मार्गदर्शन केले.


सदर प्रसंगी अधिवक्ता संघाचे अध्यक्ष  अर्जुन पाटील, न्यायाधीश श्रीमती एस. एस. पाखले,  ए. ए. खंडाळे, एन. एस. बुद्रुक, पी. पी. बागुल,  एस. ए. सोनवलकर,  एस. ए. साळुंखे, उपाध्यक्ष शशिकांत घाडगे तसेच विधीज्ञ व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.       

Reactions

Post a Comment

0 Comments