Hot Posts

6/recent/ticker-posts

कुक्कुट पालन प्रशिक्षण शुभारंभ पशु पालकांना प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

 कुक्कुट पालन प्रशिक्षण शुभारंभ

पशु पालकांना प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन 



 

 सोलापूर(कटूसत्य वृत्त):-जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाअंतर्गत सधन कुक्कुट विकास गटनेहरू नगरसोलापूर येथे कुक्कुट पालन प्रशिक्षणाची तुकडी क्र. 2 उद्घाटन शैलेंद्र विश्वासराव पाटील व महिला प्रशिक्षणार्थी लता सुनील लामकाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सधन कुक्कुट विकास गटाचे पशुधन विकास अधिकारी डॉ.स्त्रेहंका बोधनकर यांनी कुक्कुट पालनास चालना मिळण्यासाठी मार्गदर्शन केले. 


                प्रशिक्षण तुकडी दि. 12 डिसेंबर 2023 अखेर चालणार असून जिल्ह्यातील पशु पालकांनी नोंदणी करून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी यांनी केले आहे.  शेतीपूरक  जोड व्यवसायास चालना मिळण्यासाठी व  त्यातून पशुपालकांचे अर्थार्जन होण्यासाठी प्रशिक्षण देणार असून यातून शेतमजूरमहिलासुशिक्षित बेरोजगार यांना व्यवसाय सुरू करूण्याची  संधी लाभणार आहे.


                 कार्यक्रम यशस्वी होण्यसाठी एस.पी. मानेसहाय्यक पशुधन विकास अधिकारी व जमादारपरिचर यांनी परिश्रम घेतलेले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments