Hot Posts

6/recent/ticker-posts

माढ्यात दुध दरवाढीसाठी शेतकर्याचे अनोखे आंदोलन,गाईला दुधाने अंघोळ घालुन सरकारचा नोंदवला निषेध,

 माढ्यात दुध दरवाढीसाठी शेतकर्याचे अनोखे  आंदोलन,गाईला दुधाने

 अंघोळ घालुन सरकारचा नोंदवला निषेध,शंभु साठे च्या नेतृत्वाखाली

 माढ्यात आंदोलन 


माढा (कटूसत्य वृत्त):-माढ्यात दुध उत्पादक शेतकर्यांनी  एकत्रित येऊन दुध दर वाढी च्या मागणी प्रश्नी गाईला चक्क  दुधाने अंघोळ घालुन राज्य सरकारचा निषेध नोंदवुन एक तास रास्ता रोको आंदोलन केले.माढा शहरातील इंदिरा गांधी चौकात शंभु साठे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांनी आंदोलन केले.सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत आंदोलन पार पडले.शासनाने दुधाला ३४ रुपये हमी भाव देण्याचा निर्णय घोषित केला आहे.मात्र तो अजुनही शेतकर्याच्या पदरात पडलेला नाही.एकीकडे पशुधनाचे वाढलेले दर आणी दुसरीकडे दुधाला केवळ २६ रुपये मिळत असलेला कमी दर यामुळे दुध उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

माढा तालुका दुष्काळी यादीत असुन खरीप हंगामात तुरीचे पीक जास्त घेतले जात असल्याने तुरीचा व इतर पिकांचा पीक विम्यात समावेश करावा.पेरणी होऊन पाऊस न झालेने सन २०२३ तुरीचे पीके जळून गेले आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.तुरीचा विमा अग्रीम मध्ये समावेश करण्यात आलेला नाही.तरी तो समावेश करण्यात यावा व शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रमी विमा मिळावा.चारा, मका, भरडा आणि पेंड भाव वाढ शंभर टक्के झालेली आहे. आणि दुध दर प्रत्येक १० दिवसाला एक रुपयाने कमी होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर जनावरे कशी जगवायची हो मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.माढा तहसिल कार्यालय समोरील  इंदिरा गांधी चौकात रास्ता रोको आंदोलन करुन गाईला चक्क दुधाने अंघोळ घालुुन आंदोलन झाले.आंदोलनात माढा शहरासह तालुक्यातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.मागण्याचे निवेदन तहसीलदार विनोद रणवरे यांनी स्विकारले.पोलिस प्रशासनाने चोख  बंदोबस्त ठेवला होता.

कृषी विभागाचे अधिकारी न आल्याने आंदोलक आक्रमक-आंदोलन प्रसंगी कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी भारत कदम यांचेसह एक ही अधिकारी व कर्मचारी उपस्थित न राहिल्याने आंदोलक शेतकर्यानी आक्रमकता दर्शवून कृषी विभागाचा निषेध नोंदवला.

 दुध दर वाढ न केल्यास खासगी व सहकारी दुध संघाचे माढा तालुक्यात  टॅकर येऊ दिले जाणार नाहीत.जो पर्यत शासनाने जाहीर केलेल्या दरा प्रमाणे दर दिले जाणार नाहीत.तोपर्यंत आंदोलनाचा भडका सुरुच ठेवण्याचा  इशारा शंभु साठे यांनी  दिला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments