Hot Posts

6/recent/ticker-posts

माढ्यात मराठा समाजाच्या महिलाचे आरक्षणासाठीचे पाचव्या दिवशी चक्री उपोषण स्थगित,२४ डिसेंबर पर्यंत आंदोलन,मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी

 माढ्यात मराठा समाजाच्या महिलाचे आरक्षणासाठीचे पाचव्या  दिवशी

 चक्री उपोषण  स्थगित,२४ डिसेंबर पर्यंत  आंदोलन,

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र  देण्याची मागणी 


माढा  (कटूसत्य वृत्त):-माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजाच्या महिलांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाण पत्र देण्याच्या मागणीसाठी सुरु केलेले चक्री उपोषण पाचव्या दिवशी स्थगित करण्यात आले आहे.तहसीलदार विनोद रणवरे यांनी मागण्याचे निवेदन स्विकारले.
माढ्याच्या काॅग्रेस च्या नगराध्यक्षा अॅड मिनल साठे,उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे,नगरसेविका संजिवनी भांगे,अनिता भांगे,यांचेसह  अन्य नगरसेविका व शहरातील मराठा समाजातील महिला उपोषणात  उत्स्फुर्तपणे सक्रिय झाल्या होत्या.महिलांच्या चक्री उपोषण आंदोलन स्थळी  माढा बार असोसिएशन,डाॅॅक्टर  असोसिएशन,माढा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट,माढा ब्राम्हण संघासह अन्य संघटनांनी पाठिंबा दर्शवला होता.सरकारने कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देण्याची आग्रही मागणी आंदोलक महिलांनी केली आहे.महिलांनी आंदोलन स्थळी मराठा समाजाला आरक्षणाची का गरज आहे ? या संदर्भात रोखठोक भुमिका मांडुन सरकारने मराठा आरक्षण देण्याची आग्रही मागणी केली.मराठा आरक्षणावर आधारित महिलांनी यावेळी कवीता व गीत सादर करुन मराठा आरक्षणा संदर्भात घोषणाबाजी केली.आंदोलन स्थळी शाहीर महात्मा जाधव यांच्या शाहिरीचा कार्यक्रम पार पडला.उपोषण स्थगित घेतेवेळी सकल मराठा समाजाच्या महिला नागरीक उपस्थित होत्या.
Reactions

Post a Comment

0 Comments