Hot Posts

6/recent/ticker-posts

उत्कर्ष एक सामाजिक जाणीव फाउंडेशनकडून वंचित विद्यार्थ्यांची दिवाळी

 उत्कर्ष एक सामाजिक जाणीव फाउंडेशनकडून वंचित विद्यार्थ्यांची दिवाळी



मोहोळ (कटूसत्य वृत्त):-परमेश्वर प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेतील 25 अनुसूचित जाती व जमाती आश्रम शाळा नजीक पिंपरी या शाळेतील दहा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमन 10, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कौठाळीच्या 5, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाळूजच्या 2 व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मनगोळीच्या 1 अशा एकूण 55 निराधार, वंचित म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना आई-वडील नाहीत किंवा आई-वडिलांपैकी कोणीतरी एक जण नाही अशा विद्यार्थ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी या हेतूने मोहोळ मधील उत्कर्ष सामाजिक संस्थेतर्फे ड्रेस, चप्पल, टॉवेल, साबण, उटणे इत्यादी साहित्य बॉक्स पॅक करून देण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष कृष्णात माळी, रमेश आदलिंगे, नागेश बिराजदार, अशोक माळी, महावीर कोळेकर, अनिल चोरमुले, आबा चोरमुले व इतर सर्व मोहोळ उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. परमेश्वर आश्रम शाळेतील कार्यक्रमात दीपक माळी उपाध्यक्ष जिल्हा दूध संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी महेंद्र नवले यांनी पाहुण्यांची सगळ्यांना ओळख करून दिली याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक जब्बार शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन संतोष फपाळ यांनी मानले कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांना अल्पोपार देण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळमण या शाळेत मुख्याध्यापक प्रशांत मिसळ व त्यांचा सर्व शिक्षक स्टाफ कवठाळीचे समीर बागवान व सर्व शिक्षक स्टाफ वाळूज मनगोळी चे शिक्षक व पालक उपस्थित होते
Reactions

Post a Comment

0 Comments