प्रभात मल्टिस्टेट को.ऑ.कडून दिवाळी किट वाटप
कसबे तडवळे. (कटूसत्य वृत्त):-धाराशिव तालुक्यातील कसबे तडवळे येथील प्रभात मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., लातूर स्थापनेपासून म्हणजे 2012 पासून सभासदांना दिवाळी निमित्त साखर व तेलाचे सवलतीच्या दरात वाटप करते. संस्थेच्या लातूर, धाराशिव, उमरगा व तडवळा या ठिकाणी शाखा असून संस्थेचे 4855 सभासद आहेत. दर साला प्रमाणे याहि वर्षी देखील सभासदांना १० किलो साखर रु. ३०/- प्रतिकिलो प्रमाणे व ५ लिटर सूर्यफूल तेल रु. ७०/- प्रति लिटर प्रमाणे देण्यात येत आहे. आज तडवळा शाखेमध्ये सभासदांना साखर व तेलाचे वाटप करताना संस्थेचे चेअरमन किशोर डाळे, तेरणा साखर कारखान्याचे माजी संचालक चंद्रप्रकाश जमाले,दिलीप करंजकर,दयानंद थोडसरे, दत्तात्रय टोणे,धनाजी गडकर,बालाजी मनके, तडवळे शाखा व्यवस्थापक सर्फराज कोरबू,दिपक जमाले व किरण पानढवळे इत्यादी उपस्थित होते.
0 Comments