माढा तालुक्यातील १४ ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी चुरशीने व शांततेत मतदान
माढा (कटूसत्य वृत्त):-माढा तालुक्यातील १४ ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी चुरशीने व शांततेत ८१.०७ टक्के मतदान झाले.५० हजार १८४ मतदारांपैकी ४० हजार ६८६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.सोमवारी सकाळी ८.३० वाजता शासकीय गोदामात मतमोजणी सुरु होणार आहे.
ग्रामपंचायतनिहाय मतदानाची अंदाजे टक्केवारी पुढीलप्रमाणे टेंभुर्णी - ७६, रोपळे (कव्हे) - ६८.१३, कन्हेरगाव - ८६.४१, वडोली -९५.८५ ,अंजनगाव (खेलोबा) -८५.४४, तुळशी - ८८.६६ , पिंपळखुंटे - ७६.७६, पिंपळनेर - ८६ , अंबाड - ८५.०९, मुंगशी - ७६.७०, लोणी - नाडी - ८५.३८, वडशिंगे - ८९.५९ , चांदज - ८८.४०, टाकळी -८३.६१
आढेगाव - ७५.०३.
0 Comments