मलिकपेठच्या नुतन सरपंचांचा कृषी उत्पन्न बाजार समितीने केला सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, November 8, 2023

मलिकपेठच्या नुतन सरपंचांचा कृषी उत्पन्न बाजार समितीने केला सत्कार

 मलिकपेठच्या नुतन सरपंचांचा कृषी उत्पन्न बाजार समितीने केला सत्कार



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मलिकपेठ ता.मोहोळच्या सरपंचपदी गणेश जगताप यांची निवड झाल्याबद्दल कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सत्कार करण्यात आला. माजी सभापती नागेश साठे यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश चवरे तर सरपंच गणेश जगताप यांचा सत्कार उपसभापती प्रशांत बचुटे यांचे हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नुतन सदस्य नाना चवरे यांचाही सत्कार करण्यात आला.

     याप्रसंगी उपनगराध्यक्ष बापू डोके, भीमाचे माजी संचालक शिवाजी चव्हाण, संचालक शशिकांत पाटील, लोकनेते शुगरचे संचालक शुक्राचार्य हावळे युवा उद्योजक मुकेश बचुटे, राजेश सुतार आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages