Hot Posts

6/recent/ticker-posts

न्यू इंग्लिश स्कूल उंडेगाव या विद्यालयात साजरा झाला जागतिक स्वच्छ हात धुवा दिन

 न्यू इंग्लिश स्कूल उंडेगाव या विद्यालयात साजरा झाला जागतिक स्वच्छ हात धुवा दिन

वैराग (कटूसत्य वृत्त):-रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल उंडेगाव या विद्यालयात 15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक स्वच्छ हात धुवा दिन साजरा करण्यात आला.

     विद्यालयाचे मुख्याध्यापक  विजयकुमार डूरे पाटील यांनी स्वच्छ हात हे सर्व रोगावरील औषध आहे असा संदेश देऊन सर्वाना या दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तर अनिल डोईफोडे सर यांनी हात स्वच्छ कसे धुवायचे याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले व त्याप्रमाणे सर्वांनी साबण व हँड वॉश चा  हात धुण्यासाठी नियमित वापर करण्याची शपथ घेतली. या प्रसंगी  नंदकिशोर गायकवाड सर नानासाहेब झालटे सर, भीमराव पवार सर अनिल डोईफोडे सर  नागनाथ बरबडे सर , चंदना रणदिवे व बारीकनाना उपस्थित होते.कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख राणी गुंजेगावकर मॅडम यांनी केले होते.

Reactions

Post a Comment

0 Comments