Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा लोकसभा मतदार संघासाठी मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांची एकमेव उमेदवारीची मागणी

 माढा लोकसभा मतदार संघासाठी मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश

 बारसकर यांची एकमेव उमेदवारीची मागणी

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मुंबई या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाची लोकसभा आढावा बैठक पार पडली.या बैठकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला.त्यामध्ये मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांची माढा लोकसभा मतदारसंघासाठी एकमेव उमेदवारीची मागणी झाली.या मागणीनंतर सदर बैठकीमध्ये  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब,प्रांताध्यक्ष जयंत पाटील,खासदार श्रीनिवास पाटील,खासदार अमोल कोल्हे,आमदार जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे,माजी मंत्री बाळासाहेब पाटील,प्रभाकर देशमुख,युवक प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख,महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी ताई खडसे,युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर,ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर आदींमान्यवरांच्या उपस्थिती सदर विषयावर सविस्तर चर्चा झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऑफिस मुंबई या ठिकाणी पार पडलेल्या आजच्या या माढा लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीसाठी सोलापूर जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे,पंढरपूरचे युवा नेते अभिजित आबा पाटील,माळशिरसचे प्रकाश पाटील,शंकर नाना देशमुख,रवि पाटील,गणेश पाटील,महेश माने,संजय पाटील घाटणेकर,करमाळयाचे सुभाष वारे,आदीजण उपस्थित होते

Reactions

Post a Comment

0 Comments