सर्वसामान्य प्रमाणिक कार्यकर्त्याला शिवसेनेमध्ये न्याय मिळाल्याची जिल्हाप्रमुख चरणराज चवरेंची कृतज्ञता - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, October 14, 2023

सर्वसामान्य प्रमाणिक कार्यकर्त्याला शिवसेनेमध्ये न्याय मिळाल्याची जिल्हाप्रमुख चरणराज चवरेंची कृतज्ञता

 सर्वसामान्य प्रमाणिक कार्यकर्त्याला शिवसेनेमध्ये न्याय मिळाल्याची

 जिल्हाप्रमुख चरणराज चवरेंची कृतज्ञता

मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्र पाठवून दिल्या चरणराज चवरे यांना शुभेच्छा



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याचे पत्र त्यांना प्राप्त झाले. स्वतः मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या या पत्रामुळे चरणराज चवरे यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिवसेना या पक्षामध्ये खरे काम करणाऱ्या निष्ठावंत व निस्वार्थी शिवसैनिकांना निश्चितपणे त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्र पाठवून दर्शवल्याची कृतज्ञतापूर्वक भावना शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी मोहोळ येथे व्यक्त केली

याबाबत चवरे म्हणाले की गेले आठ दिवसापासून माझ्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षातून तसेच पदावरून काढून टाकण्यासाठी अंतर्गत गोटातून काही पदाधिकाऱ्यांच्या हालचाली सुरू होत्या.त्या नाटयमय घडामोडींना मुख्यमंत्री एकनाथज शिंदे यांचे हे पत्र म्हणजे मोठी चपराक असून निष्ठावंताच्या पाठीमागेच मुख्यमंत्री शिंदे असतात हे सिद्घ झाले असे म्हणावे लागेल आहे. यापुढील काळातही टीकाटिपणी आणि अंतर्गत कुरघोड्यांना भीक न घालता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेमध्येच निष्ठेने भगवा घेऊन कार्यरत राहणार असल्याची भावनिक ग्वाही देखील चरणराज चवरे यांनी दिली. मुख्यमंत्रीपदासारख्या राज्यातील सर्वोच्च पदावर असलेल्या आमचे आधारवड नेते शिंदे यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांचे पत्र यापुढील काळातील माझी राजकीय उमेद आणि शिवसेना पक्षाचे काम करण्याची ऊर्जा वाढवणारेच आहे असे यावेळी चवरे म्हणाले.

अतिशय कष्टप्रद व शेतकरी कुटुंबातून येऊन सर्वसामान्य जनतेची सेवा करायची हेच ब्रीद घेऊन आमचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी राजकारणात पदार्पण केले. सर्वसामान्यना न्याय देण्याची भूमिका समोर ठेवूनच चरणराज चवरे यांनी राजकारणाच्या माध्यमातुन पार पाडण्याचा निर्धार केला.त्यांच्या या कामाचा मोबदला म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रेमळ शब्दात शुभेच्छा संदेश आम्हा सर्व निष्ठावंत पदाधिकाऱ्यांची उमेद आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीचे बळ देणार आहे.
सचिन सुरवसे 
नूतन शिवसेना तालुकाप्रमुख
मोहोळ

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages