Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळमधून पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांना उग्र वासाच्या घाणीच्या नरक यातना महामार्ग प्रशासनाबरोबर नगरपरिषदेचेही दुर्लक्ष

 मोहोळमधून पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या वारकऱ्यांना उग्र वासाच्या

 घाणीच्या नरक यातना महामार्ग प्रशासनाबरोबर नगरपरिषदेचेही दुर्लक्ष


मोहोळ (कटूसत्य वृत्त):-पंढरपूर कडे निघालेल्या वारकरी बांधवांना मोहोळ शहरात प्रवेश करताच अत्यंत उग्र वासाचा आणि अतिशय घाणीचा सामना करावा लागत आहे. मोहोळ मधील छ. शिवाजी चौक परिसरातील उड्डाणपुलाच्या दक्षिणेकडील बाजूच्या नवीन बांधकाम केलेल्या गटाराच्या बाजूला उघड्यावरच सांडपाणी ओतले जात आहे. या ठिकाणी कमालीची घाण आणि दुर्गंधी पसरली असून मोहोळ शहराच्या प्रवेशद्वाराची या घाणीने वाट लागत आहे. याबाबत मोहोळ नगर परिषदेने तात्काळ उपायोजना करत या ठिकाणी घाण ओतणाऱ्या व्यवसायिकांना शिस्त लावण्याची मागणी शहरवासीयातून केली जात आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की मोहोळ शहरातील अंतर्गत स्वच्छतेची आणि सांडपाण्याची सोय व्हावी म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडे पाठपुरावा करून मोहोळ नगर परिषदेने अद्यावत बंदिस्त गटाराची सोय केली. मात्र सदर गटाराच्या आत मध्ये सांडपाणी न टाकता सदरचे सांडपाणी सदरील उघड्या भागातच टाकून उग्र प्रकाराची घाण येथील व्यवसायिकांनी निर्माण केली आहे. याबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश डोके आणि स्वच्छता विषयक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करून या घाणीच कारणीभूत ठरणाऱ्या घटकावर कडक कारवाई करावी अशी मागणी शहरवासीयातून केली जात आहे.


पुणे ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर सर्वात लांबीचा उड्डाणपूल हा मोहोळ शहरात आहे. या उड्डाणपुलाच्या आजूबाजूला अतिशय घाणीचे साम्राज्य गेल्या अनेक वर्षापासून आहे. मोहोळ शहरातून पंढरपूर कडे जाणाऱ्या सर्विस रस्त्याच्या दक्षिणेकडील बाजूस असलेल्या विविध व्यवसायिक या ठिकाणी हॉटेलमधील घाण कचरा याशिवाय मांसाहारी पदार्थाचे शिल्लक राहिलेले अवशेष आणि इतर घाण ओततात सदरची घाण कुजून इतका उग्र वास निर्माण होतो की शहरात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला त्याच बरोबर पंढरपूर कडे जाणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना हा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतेचा भंग करणाऱ्या या घटकांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून केली
Reactions

Post a Comment

0 Comments