Hot Posts

6/recent/ticker-posts

तुळजापूर ड्रग्सवरुन जुंपली, ओमराजे निंबाळकर अन् राणा पाटलांमध्ये पालकमंत्र्यांसमोरच खडाजंगी

 तुळजापूर ड्रग्सवरुन जुंपली, ओमराजे निंबाळकर अन् राणा पाटलांमध्ये पालकमंत्र्यांसमोरच खडाजंगी


धाराशिव (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूरमध्ये ड्रग्स सापडल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली. विशेष म्हणजे तुळजापूरनंतर भगवंत नगरी बार्शीतही ड्रग्स आढळून आले असून पोलिसांनी आरोपींना अटकही केली आहे. तुळजापूरमधील ड्रग्सचा मुद्दा सातत्याने गाजत असून राजकीय वादाचा मुद्दा बनला आहे. त्यातच, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थिती सुरू असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ड्रग्स प्रकरणावरुन चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. यावेळी, खासदार ओमराजे निंबाळकर  आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचं दिसून आले. होय, माझ्या बापाने दूध विकलं, दूध विकण काय गुन्हा आहे का, बापाने दूध  विकल्याचा मला अभिमान आहे. दुध विकलंय, ड्रग्स नाही, असे म्हणत खासदार ओमराजे निंबाळकर आमदार राणा पाटलांवर संतापल्याचे दिसून आले. ड्रग्स प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार आहेत, त्यांचे नातेवाईक पत्रकार परिषद घेऊन आमचा बाप काढतात, त्यांना अभय कोणाचे? असा सवाल खासदार निंबाळकर यांनी उपस्थित केला. आमचा बाप दुध विकत होता, कोणाला ड्रग्ज खाऊ घालत नव्हता, असेही खासदार महोदयांनी म्हटलं. प्रकरणातील आरोपी कोणत्या नेत्याबरोबर उपचार घेण्यासाठी गुजरातला गेला हे तपासून पाहा. ड्रग्स प्रकरणातील आरोपीचे संबंध कोणाबरोबर आहेत ते तपासून बघा, असे प्रश्नार्थक संकेतही निंबाळकर यांनी दिले.
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरुन खासदार निंबाळकर यांचा राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर निशाणा साधला. तर, ड्रग्स प्रकरणाची माहिती मी पोलिसांना दिली, पण काहीजण कांगावा करत आहेत असे म्हणत ओमराजे निंबाळकर यांनी राणा जगजितिंह पाटील यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला. तर, तुळजापूर बदनाम करण्याचे षडयंत्र असून काही लोक ड्रग्ज प्रकरणाचे राजकारण करत असल्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले. दरम्यान, तुळजापूर ड्रग्स प्रकरणात कुठल्याही पक्षाचा आरोपी असेल तरी त्याला सोडणार नाही, पोलीस अधीक्षकांना आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्याची माहिती पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची दिली. तसेच, तुळजापुरातून ड्रग्सचा बीमोड करण्याचं आश्वासनही पालकमंत्र्यांनी नियोजन बैठकीतून दिलं. फरार असलेले 22 आरोपी लवकरच पोलीस पकडतील आणि त्यांना त्यांची जागा दाखवतील, सरनाईक यांनी स्पष्ट केले. दरम्यान, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आत्तापर्यंत एकूण 36 आरोपी निष्पन्न झाले असून त्यापैकी 22 आरोपी फरार आहेत, तर 14 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या ड्रग्सप्रकरणी पोलीस खोलवर जाऊन तपास करत आहेत. मुंबई, पुणे किंवा इतर शहरातील कनेक्शनचाही शोध घेतला जात आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments