Hot Posts

6/recent/ticker-posts

गोपाळपूर येथील वाळू तस्करीवर पुन्हा हातोडा

 गोपाळपूर येथील वाळू तस्करीवर पुन्हा हातोडा




दोन जणांवर गुन्हा दाखल


पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथे वाळू तस्करीने थैमान घातले होते. या तस्करीवर अंकुश ठेवण्याचे काम , पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याने हाती घेतल्याचे दिसत असून , सलग चार दिवसात वाळू तस्करीवर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महेश ज्ञानेश्वर गडदे आणि विजय इंगळे या दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,
सोमवार दि. २८ एप्रिल रोजी पहाटे ५:३० वाजण्याच्या सुमारास गोपाळपूर हद्दीतील
भीमा नदीच्या पात्रातून वाळूचे अवैध उत्खनन करून महेश गडदे आणि विजय इंगळे 
हे बिगर नंबरचे अशोक लेलँड कंपनीचे छोटे टेम्पो मधून वाळू चोरून घेऊन जात होते. हे पोलिसांच्या निदर्शनास आले.
दोन्ही टेम्पोमध्ये दोन दोन ब्रास वाळू भरलेली होती. या दोन्ही वाहनांसह वाळू ताब्यात घेऊन, संबंधित दोन जणांवर पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगेश रेकडे यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  टी.वाय. मुजावर यांनी वाळू तस्करीवर आपली नजर वळवल्याचे दिसत आहे.


वाळू तस्करांवर गुन्हे दाखल होण्याचे काम सुरू

काही दिवसांपूर्वी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून वाळू तस्करी विरोधात कारवाया केल्या जात होत्या. परंतु या कारवाईत बिगर नंबरचे वाहन अथवा वाळूचे ढिगारे दाखवून अज्ञात वाळूतस्करांवर गुन्हे दाखल करण्यात येत होते. पंढरपूर तालुका पोलीस प्रशासनाकडून प्रथमच वाळू तस्करांवर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे. तालुका पोलीस प्रशासनाच्या या कारवायांचे सामान्य नागरिकांकडून जोरदार स्वागत होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments