डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येचा गुंता वाढला; सुसाईड नोट अन् पिस्तूलबाबत संभ्रम कायम,
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरमधील प्रसिद्ध मेंदू विकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांनी १८ एप्रिल रोजी गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली आहे. डॉक्टराच्या आत्महत्येचे गूढ अजूनही कायम आहे. डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलिस चौकशीतही त्याची उत्तरे अद्याप मिळालेले नाहीत. डॉक्टरांना त्यांच्याच दवाखान्यात उपचारासाठी नेल्यावर उपचारावेळी अंगावरील कपडे स्क्ताने माखले होते आणि त्यावेळी कपडे फाडून काढले होते, तरीही शवविच्छेदनावेळी कपडे फाडले आणि त्यांच्या झडतीत चिठ्ठी सापडल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आलेला आहे? विशेष म्हणजे पोलिस आयुक्तांनी सुसाईड नोट सापडली नसल्याचे सांगितले होते, त्यामुळे सुसाईड नोट नेमकी नेमकी सापडली कुठे? तसाच संशय पिस्तूलबाबत आहे, त्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढत चालला आहे. पोलिस त्यावर काहीही बोलताना दिसून येत नाहीत.
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात हॉस्पिटलची प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने हिला अटक करण्यात आलेली आहे. पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही, त्यामुळे पोलिसांनीच मनीषा मुसळे माने हिच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली आहे. मुसळे माने हिच्या वकिलांनी तिच्यावरील आरोप फेटाळून लावत जामीनासाठी अर्ज केला आहे. तिच्या अर्जावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिस चौकशीही त्याची अद्याप उत्तरे मिळालेली नाहीत. डॉक्टरांनी बाथरूमध्ये स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या होता, डॉ. वळसंगकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. मात्र, ही पिस्तूल बाथरूमध्ये सापडण्याच्या ऐवजी ती बेडरूममधील कपाटाच्या ड्रॉवरमध्ये सापडली होती. त्यामुळे ती पिस्तूल नेमकी कपाटाच्या ड्राव्हर नेमकी आणून ठेवली. त्यावरच कोणाचे ठसे उमटले आहेत, याचा अहवाल अजूनही आलेला नाही.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या डॉक्टरांना त्यांच्याच रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्या वेळी डॉक्टरांच्या अंगावरील कपडे स्क्तांनी माखले होते. त्यामुळे ते कपडे फाडून उपचार करावे लागले होते. पण फिर्याद उल्लेख नेमका उलटा आहे. शवविच्छेदनावेळी कपडे फाडले आणि त्या वेळी घेतलेल्या झडतीत चिठ्ठी सापडल्याचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यामुळे ससाईट नोटबाबत संभ्रम निर्माण होत आहे. डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरण ही एक हायप्रोफायल केस आहे, त्यामुळे आरोपी मनीषा मुसळे माने हिने केलेल्या घाणेरड्या आरोपांचा शोध घ्यायचा असल्याचे तपास अधिकाऱ्यांनीच न्यायालयासमोर सांगितले होते. पण, मनीषा मुसळे माने हिची पोलिस कोठडी संपली तरी घाणेरडे आरोप नेमके कोणते ? हेही समोर आलेले नाही.
0 Comments