Hot Posts

6/recent/ticker-posts

सरकारच्या या निर्णयामुळे रिक्षा टँक्सी चालकांना बसणार फटका

सरकारच्या या निर्णयामुळे रिक्षा टँक्सी चालकांना बसणार फटका

 

मुंबई (कटूसत्य वृत्त):-राज्यातील वाढती वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि इंधनखर्च लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत खासगी कार पूलिंग सेवा कायदेशीर करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

याआधी बाईक पूलिंगला परवानगी दिल्यानंतर आता कार पूलिंगलाही अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. कार पूलिंग म्हणजे एकाच मार्गावर जाणाऱ्या अनेक व्यक्तींनी एकाच कारमध्ये एकत्र प्रवास करणे. यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होऊन इंधनाची बचत होते, तसेच प्रदूषणातही घट होते. ही सेवा आता नोंदणीकृत अॅप किंवा वेब आधारित प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अधिकृतपणे सुरू करता येणार आहे. 'ग्रीगेटर निती 2020 ' च्या आधारावर निर्णय केंद्र सरकारच्या 'ग्रीगेटर निती 2020 ' च्या मार्गदर्शक तत्वांनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अंतिम मंजुरी केंद्र सरकारकडून मिळावी लागणार असल्याने त्यासाठी पुढील प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. या निर्णयामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. कार पूलिंग सेवा सुरू झाल्यास प्रवाशांचा कल सुरक्षित, स्वस्त आणि अॅप आधारित सेवांकडे वळेल, असा त्यांचा दावा आहे. यामुळे पारंपरिक सेवांवर आर्थिक फटका बसेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments