महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे
यांच्या हस्ते विविध विभागाच्या पुरस्काराचे वितरण
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त पोलीस परेड ग्राउंड येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण प्रसंगी विविध विभागाअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर झालेले होते त्या पुरस्काराचे वितरण पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
महसूल विभाग पुरस्कार - मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथील ग्राम महसूल अधिकारी सतीश शिवाजी बीजले यांना आदर्श तलाठी पुरस्कार पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला 5000 रोख रक्कम व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
*पोलीस विभाग - या विभागांतर्गत पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर व पोलीस अधीक्षक ग्रामीण अंतर्गत कार्य अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर...* पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र...
पोलीस निरीक्षक संगीता तुळशीदास पाटील, पोलीस उपनिरीक्षक नागनाथ सुधर्म कानडे, पोलीस उपनिरीक्षक मकरंद उद्धव कुलकर्णी, पोलीस उपनिरीक्षक विलास हनुमंत इंगळे, पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र भालचंद सातपुते, पोलीस उपनिरीक्षक दिलीप निवृत्ती किर्दक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सिद्धू विश्वनाथ थोरात, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महंमद करणाचे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र मारुती बंडगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुरुसिद्धआप्पा महादेव इंगळे, पोलीस हवालदार विजय आनंद पोळ, पोलिस हवालदार दीपक सुदाम चव्हाण, पोलीस हवालदार दीपक कमलाकर डोके, पोलिस अंमलदार दादासाहेब हरीकांत सरवदे,
पोलीस अधीक्षक कार्यालय सोलापूर ग्रामीण- पोलीस उपअधीक्षक भागवत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनोद घाटे, सहाय्यक पोलीस उपनिरक्षक चंद्रकांत बाबुराव पवार, पोलीस उपनिरीक्षक सुभाष शंकर शेंडगे, पोलीस हवालदार संतोष सत्यवान गायकवाड, उत्कृष्ट पथसंचालक परेड कमांडर राहुल महादेव मडावी.
*आरोग्य विभाग - छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय यांच्याकडून मृत्यू समयी अवयव दान करणाऱ्या पृथ्वीवर वटे व शुभम बिराजदार यांच्या नातेवाईकांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
*क्रीडा विभाग - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हा युवा पुरस्कार प्रसाद श्रीहरी खोबरे यांना जाहीर करण्यात आला होता पुरस्कार ट्रॉफी व प्रमाणपत्र पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री. खोबरे यांना देऊन गौरविण्यात आले.
महसूल विभाग कर्मचारी सन्मान - महसूल विभागांतर्गत उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक एक प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घरे योजना अंतर्गत घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांना शासकीय जागा वाटप आदेश गतिमान पद्धतीने प्रदान केल्याबद्दल श्रीमती प्रज्ञा सतीश मठ, ज्ञानेश्वर रावसाहेब इनामदार, अनिल माळी, अनुसया सदानंद खराडे, श्रीमती उमा भारत जाधव, उमेश सिद्धेश्वर कुंभार, विजया शशिकांत भालुदे, शौकत बोगे या सर्वांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
0 Comments