आरोग्य विद्यापीठात आज मा. राज्यपाल यांची आढावा बैठक
नाशिक (कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस गुरुवार, दि. 12 ऑक्टोबर 2023 रोजी विद्यापीठ मुख्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीस विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प., मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ व अधिकारी उपस्थित राहतील.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, मा. कुलपती तथा राज्यपाल यांना विद्यापीठ आढावा बैठकीत मा. कुलगुरु महोदया विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाबाबत माहिती देणार आहेत. विद्यापीठ कामकाजाबाबतचा व्हिडीओ स्वरुपात माहितीपट मा. कुलपती महोदयांना दाखविण्यात येईल. आरोग्य शिक्षणासंदर्भात विविध विषयांवर चर्चा, विद्यापीठाचा ग्रीन कॅम्पस आदी बाबत मा. राज्यपाल महोदयांना माहिती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यापीठातील आढावा बैठकीचे आयोजन विद्यापीठ मुख्यालयातील डॉ. डी. वाय. डोणगांवकर सभागृहात सकाळी 10.45 वाजता करण्यात आले आहे.
0 Comments