Hot Posts

6/recent/ticker-posts

शहाजीबापू पाटलांनी तानाजी सावंतांना डिवचलं

शहाजीबापू पाटलांनी तानाजी सावंतांना डिवचलं 

 सोलापूर (कटूसत्य वृत्त):-माजी आरोग्यमंत्री व शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे सध्या राजकारणापासून अलिप्त असल्याचं दिसून येत आहे. एकीकडे मराठवाड्यातलं राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू असताना सावंतांचं असं शांत राहण्यावरुन राजकीय नेतेमंडळींमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. यातच आता सांगोल्याचे माजी आमदार व शिवसेनेचे नेते शहाजीबापू पाटलांनी तानाजी सावंतांना डिवचलं आहे.

माजी आमदार शहाजीबापू पाटील हे सोलापुरायांनी तानाजी सावंतांवर निशाणा साधला आहे. पाटील म्हणाले,तानाजी सावंत धाराशिवमधून आमदार आहेत. त्यामुळे सोलापुरातील बॅनरवर त्यांचा फोटो असण्याचा कोणताही निर्णय पक्षपातळीवर झालेला नाही. दरम्यान, तळागाळातून जाणाऱ्या नेत्याला राजकारणातल्या प्रत्येक गोष्टी समजत असतात. पण तानाजी सावंत यांची राजकारणातली एन्ट्रीच अचानकपणे झाली आणि ते बाजूलाही अगदी अचानकपणे निघून गेल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

तसेच तानाजी सावंत  धाराशिवमधून आमदार आहेत. त्यामुळे सोलापुरातील बॅनरवर त्यांचा फोटो असण्याचा कोणताही निर्णय पक्ष पातळीवर झालेला नाही. तानाजी सावंत हे मोठ्या शिक्षण संस्था चालवतात. पाच- सहा कारखाने झालेले आहेत आणि काही कारखाने त्यांना आणखी खरेदी करायचे आहेत. अशा व्यापात ते गुंतल्यामुळे शिवसेना पक्ष कार्याकडे त्यांचं कमी लक्ष झालं असल्याचा चिमटाही शहाजीबापूंनी यावेळी सावंतांना काढला. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरही कठोर शब्दांत भाष्य केलं. ते म्हणाले, निष्पाप लोकांची निर्घृणपणे केलेली ही हत्या आहे. निश्चितच भारत याचे चोख प्रत्युत्तर देईल. देशाची 140 कोटी जनता मोदींच्या पाठीमागे आहे. पाकिस्तानला याबाबतीत निश्चित धडा शिकवला पाहिजे. पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली पाहिजे असंही त्यांनी यावेळी म्हटलं. पाटील म्हणाले, आज डिप्लोमॅटिक पद्धतीनं पहिले पाऊल टाकलेले आहे. यानंतर अतिरेक्यांबाबत पाकिस्तान काय निर्णय घेते, ते पाहावा लागेल.त्यावरती भारत पुढचे पाऊल ठरवेल. युद्धाचा जरी निर्णय झाला तरी देश तयार आहे. नरेंद्र मोदी कणखर नेतृत्व आहेत. पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याचा निर्णय मोदी घेतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Reactions

Post a Comment

0 Comments