एकच रथ माघारी येणार, विजयाचा किंवा अंत्ययात्रेचा जरांगेंचं मुंबईत आंदोलन! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, May 1, 2025

एकच रथ माघारी येणार, विजयाचा किंवा अंत्ययात्रेचा जरांगेंचं मुंबईत आंदोलन!

 एकच रथ माघारी येणार, विजयाचा किंवा अंत्ययात्रेचा

जरांगेंचं मुंबईत आंदोलन! 

जालना (कटूसत्य वृत्त):- मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सरकारकडे पाच ते सहा मागण्या केल्या असून त्या २८ तारखेपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर २९ तारखेपासून मुंबईत आंदोलन होणार असून येताना एकतर विजयाचा रथ येईल किंवा अंत्ययात्रेचा; असा निर्धार जरांगेंनी बोलून दाखवला, ते बुधवारी माध्यमांशी बोलत होते.

जरांगे पाटील म्हणाले की, शिंदे समितीने चांगलं काम केलं,त्यांच्याकडून सरकारने काम करुन घेतलं. त्यामुळे सरकराचं मी कौतुक केलं. ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत, मात्र अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत. काही अधिकारी जातीयवाद करीत नाहीत. प्रमाणपत्र दिलं तर मुद्दामहून व्हॅलिडिटी दिली जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. एका मुलाचं अॅडमिशन रद्द झालं, त्यानंतर दोन-तीन दिवसात व्हॅलिडिटी मिळाली. हे सरकारचं षडयंत्र तर नाही ना?

ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्याची माहिती ग्रामपंचायतीच्या फलकावर चिटकाव्यात.. गावात दवंडी देऊन माहिती द्यावी. त्या नोंदींवरुन तातडीने प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करा. जिथल्या नोंदी असतील त्या ग्राह्य धरुन मराठ्यांना हक्क दिला पाहिजे. जर कुणी अधिकारी हलगर्जीपणा करीत असेल तर त्याला बडतर्फ करा, अशी माझी मुख्यमंत्र्यांकडे आहे.

मनोज जरांगे पुढे म्हणाले, दुसरी मागणी अशी की, मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश काढा, कारण ५८ लाख नोंदी सापडलेल्या आहेत. तिसरी मागणी, सगेसोयऱ्याची अंमलबजावणी करा.. कारण ते सगळ्या जाती-धर्मासाठी आहे. सगळ्या गोरगरीबांचे त्यामुळे कल्याण होणार आहे. सगळ्या जाती-धर्मातल्या मुलींना मोफत शिक्षण देण्याची मागणी आम्ही केली होती. त्यामुळे सर्व जातीच्या मुलींचं कल्याण झालं आहे.

चौथी मागणी, आमच्यावरच्या केसेस मागे घेतल्या जाव्यात. सरकारने शब्द दिला होता. पण आता ते विसरत आहेत. मराठ्यांनीच ही सत्ता मिळवून दिलेली आहे. जातीसाठी मी मरायला भीत नाही. मुंबईत त्यासाठीच येतोय, माझ्यावर हल्ला करायचा प्लॅन असेल तर मीच मुंबईत येतोय. जे आंदोलन आंतरवलीत होणार आहे, तेच मुंबईतही होणार आहे. २९ ऑगस्टला हे आंदोलन होईल.

२८ ला मला सोडायला मुलं येतील त्यानंतर २९ तारखेला ते माघारी शेतीतली कामं करतील. माझ्या मुलांना जराही धक्का लागला तर कुणाचीच खैर करणार नाही. मुंबईमध्ये मी शांततेत आंदोलन करणार आहे. २८ ऑगस्टच्या आत सगळ्या अंमलबजावण्या झाल्या पाहिजेत.

पुढची मागणी अशी की, हैदराबाद गॅझेट लागू करा. आमच्या संयमाचा अंत होत आहे. मुंबईत जाताना मी दोनच गोष्टी घेऊन जाणार आहे. एक विजयाचा रथ आणि दुसरा अंत्ययात्रेचा रथ. दोन्हीपैकी एक वापस येणार, हे फडणवीसांनी लक्षात ठेवावं, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages