डॉ.वळसंगकर आत्महत्याप्रकरणी मनीषाशिवाय
आणखीन कोण जबाबदार ?
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-विख्यात मेंदू विकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्याप्रकरणी पोलिसाचे तपास पथक पुरावे शोधण्यासाठी धडपडत असून, आरोपी मनीषा माने -मुसळे न्यायालयीन कोठडीतही प्रश्नांचा भडीमार सुरू आहे. कॉल रेकॉर्डिंग तर दररोज दोन-तीनदा ऐकलं जात आहे. आरोपी मनीषाची न्यायालयीन कोठडी ९ मे रोजी संपणार असून, पुन्हा पोलिस कोठडी मागण्यासाठी तपास पथकाला सबळ पुरावा हाती लागत नसल्याची माहिती सूत्राने दिली. पोलिसांनी मंगळवारी हॉस्पिटलला भेट देऊन काही वैद्यकीय कर्मचाऱ्यांची चौकशी केली. मात्र, त्यातून हाती काहीच लागले नसल्याने तपासाची स्थिती जैसे थे असल्याचे या सूत्राने सांगितले.
पोलिसांचे तपास पथक आपला संपूर्ण तपास गुलदस्त्यात ठेवत आहेत. माध्यमांपर्यंत तपासाच्या प्रगतीची कोणतीच माहिती पुरविली जात नाही. तथापि, सूत्रांच्या आधारे पोलिसांचा तपास आणखी एका दिशेने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. वळसंगकर हे स्वतःवर गोळ्या झाडण्यापूर्वी तणावाखाली होते. ही त्यांची मानसिक स्थिती नेमक्या किती दिवसांपासून होती आणि या स्थितीला मनीषाशिवाय आणखीन कोण जबाबदार आहेत का? ही या तपासाची दुसरी दिशा असल्याचे सूत्राने स्पष्ट केले.
0 Comments