"पुढच्या वर्षी परत जम्मू काश्मीरला जाणार"
सोलापूरच्या पर्यटकाने सांगितला पहलगाम हल्ल्याचा अनुभव
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सोलापूरमधील काही पर्यटक सुखरूपरित्या घरी परतले आहेत. पंडित बनसोडे असे पर्यटकाचे नाव असून त्यांच्यासोबत जवळपास 40 पर्यटक सोबत होते. सर्व पर्यटकांना सुखरूपरित्या परत आणण्याचे काम पंडित बनसोडे यांनी केले. पंडित बनसोडे यांनी प्रत्यक्ष आलेला अनुभव व्यक्त करताना त्यांनी महत्वाच्या विषयावर भाष्य केले. दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या.
हा काहीतरी राजकीय षडयंत्र असू शकतो, जम्मू काश्मिर राज्यात असं जातीपातीच राजकारण नाहीय. भारतीय नागरिकांनी अशा जातीपातीच्या राजकारणात बळी पडू नये अशी, विनंती पंडित बनसोडे यांनी केली आहे. दहशतवाद्यांना जात नसते, त्यामुळे जातीच राजकारण करू नये. उलट माझ्यासह चाळीस पर्यटकांना काश्मीरमधील मुस्लिम नागरिकांनी मोलाची मदत केली.
दरवर्षी आम्ही काश्मीरला फिरायला जातो, या आतंकवादी हल्ल्यामुळे घाबरणार नाही, पुढच्या वर्षी पुन्हा काश्मीरला जाणार,पहलगामला जाणार असा आत्मविश्वास पंडित बनसोडे यांनी व्यक्त केला. पहलगामवर झालेल्या हल्ल्यानंतर सर्वत्र भितीचे वातावरण बघायला मिळाले. दहशतवाद्यांनी हिंदू टार्गेट केले. हेच नाही तर या हल्ल्याचे अनके व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.
पहलगाम हल्लानंतर भारताची आक्रमक भूमिका
पहलगामवरील हल्ल्यानंतर लोकांमध्ये एक संताप बघायला मिळतोय. भारताने हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात आक्रमक भूमिका घेतलीये. सिंधू नदीचे पाणी रोखण्यात आले. लोकांमध्ये एक वेगळाच संताप या हल्ल्यानंतर दिसतोय. हे दहशतवादी पाकिस्तानमधून आल्याचे स्पष्ट झालंय. हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. सुरक्षा यंत्रणा या दहशतवाद्यांच्या मागावर आहेत. लष्कराकडून जम्मू काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन राबवले जातंय. काल देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत एक महत्वाची बैठक दिल्लीमध्ये घेतली. या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे काही मंत्री भडकावू भाष करताना दिसत आहेत.
0 Comments