सभापतिपदासाठी पक्ष प्रवेशाची अट..
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचे काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. तसे जाहीर करण्यात आले होते. आता आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आघाडीची चर्चा आली. आता बाजार समितीत सभापती कोण होणार याची उत्सुकता लागली आहे. माजी आमदार दिलीप माने हे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या जवळचे आहेत. मात्र, त्यांचा ओढा अजित पवार गटाकडे असल्याचे बोलले जात आहे. कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे हे सध्या तरी आ. कल्याणशेट्टी यांच्या जवळचे आहेत. मात्र, ते काँग्रेसमध्येच राहणार की पक्षांतर करणार, याची चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय निवडून आलेल्या संचालकांपैकी भाजपमध्ये कोण- कोण प्रवेश करणार, याची चर्चा सुरू झाली आहे.
0 Comments