माही तुरुकमाने चित्रकला स्पर्धेत प्रथम
रिसोड (कटूसत्य वृत्त):-श्री शिवाजी विद्यायल व कनिष्ठ महाविद्यालय रिसोडच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या मध्ये कु. माही मिना प्रविण तुरुकमाने हिचा प्रथम क्रमांक आला आहे.
शालेय जिवनातच वेगवेगळ्या कला गुणांना वाव मिळून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नावलौकिक करावे यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या कडून केले जात असते. याचाच फायदा सर्वसामान्य वर्गातील विद्यार्थ्यांना होऊन त्यांच्या कला गुणांना चालना मिळत असते. माही मिना प्रविण तुरुकमाने ही विद्यार्थींनी सुद्धा अभ्यासा व्यतिरिक्त इतर म्हणजेच नृत्य, चित्रकला, क्रीडा व अभिनय, क्षेत्रात उत्तम प्रकारे प्राविण्य मिळवून अभ्यासासोबतच कलागुणांची जोपासना करते. अभ्यासा सोबतच इतरही कलागुण विद्यार्थ्यांकडे असतील तर यशाची व्याख्या बदलून प्रत्येक जन प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होईल. याच भावनेतून शिक्षकासह पालकांनी सुद्धां कलागुणांना वाव देणे आवश्यक असते. चित्रकलेची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या माहीने अंत्यत सुंदर चित्रकला साकारून विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments