Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतकरी कर्जमाफीसाठी संभाजी ब्रिगेडचा अजित पवारांना घेराव

 शेतकरी कर्जमाफीसाठी संभाजी ब्रिगेडचा अजित पवारांना घेराव

टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):-महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे  काल टेंभुर्णी येथे खाजगी कार्यक्रमासाठी आले असता संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कर्जमाफीसाठी अजित पवार यांना घेराव घालुन निवेदन दिले.गेल्या कित्येक दिवसांपासून शेतकरी अडचणीत असुन निसर्गाचा लहरीपणा,सततची नापीकी,बॅकाचा तगादा,शेतीमालास कवडीमोल भाव,वाढलेला उत्पादन खर्च या बाबींमुळे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत असुन शेतकरी बांधवांना मदत म्हणून सरसकट कर्जमाफी देऊन आपण विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासन ही या निमित्ताने पूर्ण करून शब्द पाळावा असे निवेदनाद्वारे सचिन जगताप यांनी मांडले यावेळी सचिन खुळे-ता.कार्याध्यक्ष,योगेश मुळे-शहराध्यक्ष,नवनाथ रेपे,सुनील ढवळे,विजय काळे,संजय देशमुख,शरद लिगाडे,महेश देशमुख,अमोल पाटील,उमेश जगताप ई उपस्थित होते
Reactions

Post a Comment

0 Comments