श्राविका कॉलेजमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा..!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- उमाबाई श्राविका कनिष्ठ महाविद्यालय व साने गुरुजी कथामाला महाविदयालयीन शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य सुकुमार मोहोळे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. सौ.प्रतिभा कंगळे यांनी १० आक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यापाठीमागची संकल्पना स्पष्ट केली. तसेच आजची पिढी मानसिक विकृती कडे वळत आहे त्यांच्या मानसिक आरोग्यात सकारात्मक बदल घडवून आणणे ही काळाची गरज आहे त्यासाठी जनजागृती उपक्रम घेणे गरजेचे आहे हे सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गणेश लेंगरे यांनी केले तर आभार प्रा. सोमनाथ राऊत यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अविनाश मुळकूटकर यांनी केले. यावेळी प्रा. अर्चना कानडे, प्रा. ज्योती बांगर, प्रा. प्राजक्ता काळे व महाविद्यालयीन विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
0 Comments