Hot Posts

6/recent/ticker-posts

काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना मजबूत करून २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार करा : नाना पटोले

 काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना मजबूत करून २०२४ ची लोकसभा

 निवडणूक जिंकण्याचा निर्धार करा : नाना पटोले


पुणे (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची आढावा बैठक माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणितीताई शिंदे, रमेश बागवे, बसवराज पाटील, निरीक्षक श्रीरंग चव्हाण, उल्हास पवार, मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी सोलापुर शहर काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक पुणे काँग्रेस भवन येथे घेतली.

 या आढावा बैठकीत सोलापुर शहर चेतन नरोटे यांची प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे अशी मागणी केली की, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुर शहर काँग्रेस कमिटीचे कार्य अतिशय जोरात सुरु असून सर्व बुथवर कार्यकर्त्यांची नेमनुक केली आहे. पक्षाने वेळोवेळी दिलेले कार्यक्रमे, आंदोलने, केले आहेत. सोलापुर जिल्ह्याच्या क्षेत्र मोट्ठे असल्यामुळे काँग्रेस पक्ष संघटनेच्या हिताच्या दृष्टिकोनातून, पदाधिकारी कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी, लोकांना जोडण्यासाठी, सोलापुर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र लढण्यासाठी, नेतृत्व उभे करण्यासाठी आगामी सोलापुर लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसच्या सोलापुर लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षाची नेमणुक करावी जेणेकरून पक्ष संघटनेचे काम करताना सोयीचे होईल. अशी मागणी सोलापुर शहर चेतन नरोटे यांची प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे पुणे येथील आढावा बैठकीत मागणी केली.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महागाई, बेरोजगारी, कामगार, शेतकरी विरोधी धोरणे, GST चा होणारा त्रास, इंग्रजांपेक्षा जास्त मोदी सरकार जनतेला लुटत आहे. अनेक छोटे पक्ष भाजपच्या फ़ायद्यासाठी निवडणुकीत उमेदवार उभे करून मतविभागनी करतात. त्यामुळे अनेक ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला आहे. यांना मतदान केल्यामुळे आपलेच नुकसान होत आहे हे जनतेला कळून चुकले आहे. भारत जोड़ो यात्रा काढून राहुलजी गांधी यांनी जनतेचा आवाज बुलंद केला. त्यामुळे जनता काँग्रेसकडे आशेने बघत आहे. जनताच त्यांना उत्तर द्यायला तयार आहे. २०२४ ला पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर आल्यास देशात पुन्हा एकदा गुलामगिरी, हुक़ूमशाही सुरु होईल. म्हणून मा. सुशीलकुमार शिंदे, आ. प्रणितीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समाजघटकांना सोबत घेऊन पक्ष संघटना, बूथ यंत्रणा मजबुत करून सर्व विधानसभा मतदारसंघात लढण्याची तयारी ठेवून २०२४ ची सोलापुर लोकसभा निवडणूक जिंकण्याचा निर्धार करा. सध्याचे वातावरण बघता चिमनी पाडणारे शहरातील भाजपचे दोन्हीहि देशमुख या निवडणुकीत पराभूत होतील असे सांगितले.

या बैठकीस जिल्हा अध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज यलगुलवार, जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, किसन मेकाले, रियाज हुंडेक़री, मा. प्रवीण निकाळजे, नगरसेवक विनोद भोसले, हाजी तौफ़ीक़ हत्तूरे, फिरदौस पटेल, दत्तु बंदपट्टे, महिला अध्यक्षा प्रमिलाताई तूपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, उदयशंकर चाकोते, अरुण साठे, बाबूराव म्हेत्रे, लक्ष्मीकांत साका, अंबादास बाबा करगुळे, जुबेर कुरैशी, शौकत पठाण, तिरुपती परकीपंडला, भिमाशंकर टेकाळे, श्रीकांत वाडेकर, महेश लोंढे, सैफन शेख, इलियास शेख, बसवराज म्हेत्रे, नागनाथ कदम सुमन जाधव, शोभा बोबे, विवेक कन्ना, राहुल वर्धा, राजेंद्र शिरकुल, शंकर नरोटे, सुभाष वाघमारे, यल्लाप्पा तुपदोळकर, संजय गायकवाड़, धीरज खंदारे, नागनाथ शावने, लता गुंडला, मुन्नी शेख, मुमताज तांबोळी, लता सोनकांबळे, शशिकांत जाधव, अक्षय पवार, पीयूष इंगले, अहतेशाम सय्यद, इब्राहिम शेख यांच्यासह शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments