सावळेश्वर तालुका मोहोळ येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने दोन
दिवशी साखळी उपोषणाचा भव्य रॅलीने प्रारंभ करण्यात आला.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये समाविष्ट करून त्यांना शैक्षणिक आणि सामाजिक आरक्षण द्यावे या मागणीसाठी भव्य दिव्य रॅली काढून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय भवानी जय शिवाजी तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देऊन आसमंत दणाणून सोडला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, शहाजी भोसले मोहोळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनाजी गावडे माजी पंचायत समिती सदस्य कालिदास गावडे आणि ग्रामपंचायत सदस्यांनी साखळी उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. या दोन दिवशी सकाळी उपोषणामध्ये सुधीर नीळ ,दादासाहेब हावळे, महेश सुरवसे, उमा तरटे ,सरुबाई अंबुरे, उमेश माने ,राहुल निळ, भागवत साठे, सुभद्रा भोसले, ओंकार चटके, ज्ञानेश्वर चटके ,कमलाकर पाटील, अमर जाधव ,समाधान व्यवहारे, विशाल चव्हाण ,सौरभ साठे ,बापू अंबुरे ,आबा चटके, प्रदीप निळ, प्रमोद निळ ,किरण निळ आधी सह बहुसंख्य मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषणामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सरकार दरबारी आपल्या भावना आहे पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे.या भव्य आणि दिव्य रॅलीच्या प्रसंगी मराठा बांधवांना प्रेरणा मिळण्यासाठी दादासाहेब निळ यांनी भारदार सूत्रसंचालन केले. यावेळी 90 वर्षाच्या आजी सरुबाईअं बुरे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, शहाजी भोसले, सखाराम साठे ,कालिदास गावडे आदींनी आरक्षण संदर्भामध्ये आपले विचार प्रकट केले.
0 Comments