बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शी तालुक्यातील सन २०२५ ते २०३० दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी मंगळवारी तहसिलदार शेख यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
यामध्ये अनुसूचित जाती : बांगरवाडी, गौडगांव, मांडेगांव, मळेगांव, सावरगांव. अनुसूचित जाती महिला : जामगांव (पा), दडशिंगे, तांदुळवाडी, गोरमाळे, धामणगाव आ, दहिटणे. अनुसूचित जमाती : शेलगांव (मा). अनुसूचित जमाती महिला : निरंक. नागरिकांचा मागास प्रवर्ग : खडकोणी, भानसळे, वाणेवाडी, घारी, कापशी, महागांव, पिंपळगांव (पानगांव), बोरगांव (झाडी), हळदुगे, मुंगशी (आर), रातंजन, ज्योतीबाचीवाडी, सुर्डी, पुरी, इलें, उंबरगे, हत्तीज / चिंचखोपन/हिंगणी (आर). नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : कोरेगांव, काटेगांव, भोयरे, चिंचोली/ ढेंबरेवाडी, ममदापूर, अरणगांव, घाणेगांव, ढोराळे, मालेगांव, संगमनेर, तुळशीदासनगर, तडवळे, आंबेगाव, कारी, चिखर्डे, नांदणी, धोत्रे, जामगाव (आ). सर्वसाधारण : आगळगांव, पिंपळगांव (आ), गाडेगांव, बाभुळगांव, चारे, पिंपळवाडी, उक्कडगांव/ वाघाचीवाडी, शिराळे, धानोरे, जहानपूर, पांगरी, पांढरी, घोळवेवाडी, नारी/नारीवाडी, सौंदरे, कव्हे, कळंबवाडी (पा), गाताचीवाडी/फपाळवाडी, खांडवी /गोडसेवाडी, श्रीपतपिंपरी, साकत, मानेगांव, इरलेवाडी, तुर्क पिंपरी, यावली मुंगशी (वा), भातंबरे, उपळे दु. झरेगांव, सर्जापूर, भांडेगांव, सारोळे, लाडोळे, पिंपरी आर, नागोबाचीवाडी / लक्ष्याचीवाडी, कासारवाडी, गुळपोळी, रस्तापूर, राळेरास, रऊळगाव, कासारी. तर सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी : चुंब, कळंबवाडी (आ), बेलगांव, देवगांव, बोरगांव (खुर्द), वालवड, पाथरी पिंपळगांव (पांगरी), येळंब, खामगांव, इंदापूर, तावडी, बळेवाडी बावी (आ), पानगांव, कोरफळे, अलिपूर, उपळाई (ठोंगे), शेंद्री, उंडेगांव, काळेगांव, मालवंडी, सासुरे, तांबेवाडी, हिंगणी (पा), निंबळक शेळगांव (आर), धामणगांव (दु), भालगांव, अंबाबाईचीवाडी, आळजापूर, ताडसौंदणे, रुई, खडकलगाव, कांदलगाव, शेलगांव व्हळे, कुसळंब, भोईजे, पिंपरी पान, झाडी, मिर्झनपूर.
0 Comments