नागणसूर, जेऊर, शिरवळ, हैद्रा, किणी सर्वसाधारण प्रवर्गासाठी
अक्कलकोट(कटूसत्य वृत्त):- २०२५ ते २०३० दरम्यान मुदत संपणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील ११८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण मंगळवारी जाहीर करण्यात आले. ही प्रक्रिया नवीन तहसील कार्यालयात दुपारी १२ वाजता सुरू झाली. ती दुपारी ३ वाजेपर्यंत चालली होती. आपल्या गावचे आरक्षण पाहण्यासाठी विविध गावच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
तहसीलदार विनायक मगर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार डी. एन. गायकवाड पुरवठा निरीक्षण अधिकारी विराज वासेकर, महसूल सहायक टी. व्ही. गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये लहान मुलांच्या हातून चिठ्ठीद्वारे आरक्षण काढण्यात आले. यामध्ये एकूण ११८ ग्रामपंचायतींची वर्गवारी केल्यास अनुसूचित जाती ८, अनुसूचित जाती महिला ७, अनुसूचित जमाती २, अनुसूचित जमाती महिला १, नागरिकांचा मागास प्रवर्ग १६, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला १६, सर्वसाधारण ३४ सर्वसाधारण महिला ३४ अशा पध्दतीचे हे आरक्षण काढण्यात आले.
गावनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे: * अनुसूचित जाती कल्लप्पावाडी, समर्थनगर, मिरजगी, केगाव खुर्द, वसंतराव नाईकनगर, तळेवाड, मातनहळ्ळी, गुरववाडी. महिला : गांधीनगर, पितापूर, कुरनूर, नागनहळ्ळी, जकापूर, सिंदखेड, शिरवळवाडी * अनुसूचित जमाती हसापूर, हालहळी अ. महिला देवीकवठे. * नागरिकांचा मागास प्रवर्ग खैराट, चिक्केहळी, आंबेवाडी ज, नन्हेगाव, बादोले बुद्रुक, हंजगी कंटेहळी, बोरोटी खुर्द, बोरगाव दे, मुरीकवठे, सलगर, गौडगाव बुद्रुक, कडबगाव, दहिटणेवाडी, दोड्याळ कोर्सेगाव, महिला गळोरगी, बणजगोळ, कुमठे, संगोगी आ साफळे, निमगाव, कल्लहिप्परगे, आरळी, नागोरे, संगोगी व चपळगाववाडी नाविदगी, डॉवरजवळगे, गोगाव, हालचिंचोळी, सिनूर * सर्वसाधारण तोरणी, सुलतानपूर, सुलेरजवळगे, नागणसूर, तोळणूर, हैद्रा, सातनदुधनी, अंकलगी, जेऊर, शिरवळ, बोरेगाव, सांगवी खुर्द, हंद्राळ, पारसंघ, शेगाव, बन्हाणपूर, मराठवाडी, सांगवी बुद्रुक, बबलाद, किरन घुगरेगाव, कर्जाळ, व्यागेही गौडगाव खुर्द, उमरगे, इब्राहिमपूर, किणी, आळगे, जेऊरवाडी, चिंचोळी मैं, मंगरूळ, कलकर्जाळ, सदलापूर, कुडल महिला मुगळी, हत्तीकणबस चुंगी, करजगी, बासलेगाव, शावळ, शिरसी, दहिटणे, वागदरी, उडगी, बिजगेर, म्हेसलगी, तडवळ, हनूर, बोरोटी बुद्रुक, मोटवाळ, आंदेवाडी खुर्द, किणीवाडी, हिल्ळी, कोन्हाळी, गुडेवाडी पालापूर, मुंढेवाडी, चपळगाव, रुदेवाडी, खानापूर, केगाव बुद्रुक, घोळसगाव, आंदेवाडी बुद्रुक रामपूर, काझीकणबस भोसगे दर्शनाळ, चिंचोळी न.
गांधीनगरमध्ये होती ओबीसीची मागणी
अक्कलकोट तालुक्यात नव्याने स्थापन झालेल्या गांधीनगर ग्रामपंचायत हदीमध्ये ७० टक्के लोकसंख्या ओबीसी आहे. त्यामुळे या ठिकाणी तशा प्रकारचे आरक्षण काढण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या ठिकाणी अनुसूचित जाती महिला हे आरक्षण निघाले असल्याचे स्पष्टीकरण तहसीलदार विनायक मगर यांनी दिले.
चौकट
पाच ग्रामपंचायतींचे आरक्षण दोनवेळा रद्द
याआधी मुदत संपलेल्या सातनदुधनी कल्लप्पावाडी, समर्थनगर, वसंतराव नाईक नगर, गांधीनगर या पाच ग्रामपंचायतींचे आरक्षण दोन वेळा जाहीर करण्यात आले होते. परंतु पुन्हा या नव्या आरक्षण सोडतीमध्ये या ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर नव्याने जाहीर झाल्यामुळे आधीचे आरक्षण रद्द झाले आहे.
0 Comments