संगीता जोगधनकर यांनी चेअरमन दिलीप माने यांचा केला सत्कार

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन दिलीप माने यांचा सभापती निवडी प्रित्यर्थ सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सोलापूर महिला शहराध्यक्ष संगीता जोगधनकर यांनी केला.
जोगधनकर म्हणाल्या, सभापती माने यांनी पदभार घेतल्यानंतर बाजार समितीमधील शेतकऱ्यांना सोईस्कर होईल असे अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. सायंकाळच्या सुमारास भाजीपाल्याचा लिलाव हा त्यांचा एक चांगला निर्णय आहे तसेच बाजार समितीमध्ये वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी त्यांनी वाहनधारकांना शिस्त लावून नियम कडक केले आहेत.
0 Comments