पंढरपूर तालुक्यात ९५ ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षण सोडत जाहीर
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- पंढरपूर तालुक्यातील ९५ ग्रामपंचायतींची सरपंचपद आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. यात ५० जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४६ जागा असून यात २३ जागा महिलांसाठी राखीव आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २६ जागा असून त्यात १३ जागा' नागरिकांचा मागास, प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी २० जागा आरक्षित करण्यात आल्या असून त्यात अनुसूचित जाती महिलांसाठी १० जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जमातीसाठी ३ जागा असून यात एक जागा महिलेसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. या अगोदर काढण्यात आलेले आरक्षण व आता काढण्यात आलेल्या आरक्षणात बदल झाला असल्याने गुडघ्याला बाशिंग लावून बसलेल्या भावी सरपंचाची निराशा झाली आहे. सरपंच पदाचे आरक्षण बुधवार, दि. १५ रोजी पंचायत समिती सभागृहात तहसीलदार सचिन लंगुटे, नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड, निवडणूक नायब तहसीलदार वैभव बुचके, सहाय्यक गटविकास अधिकारी विकास कौलगे यांच्या उपस्थितीत काढण्यात आले.
चौकट
सर्वसाधारण:-
१. नेपतगाव, २. बाभुळगाव, ३. शंकरगाव / नळी, ४. टाकळी गुरसाळे, ५. पेहे, ६. पिराची कुरोली, ७. कासेगाव, ८. रोपळे, ९. आंबे, १०. देगांव, ११. जळोली, १२. एकलासपूर, १३. उंबरे, १४. बिटरगाव, १५. मगरवाडी, १६. तनाळी, १७. ओझेवाडी, १८. कौठाळी, १९. केसकरवाडी, २०. खेडभोसे, २१. जैनवाडी, २२. पांढरवाडी, २३. चिलाईवाडी.
चौकट
अनुसूचित जाती :-
१. शेगांव दुमाला, २. गादेगांव, ३. भंडीशेगांव, ४. सुगांव भोसे, ५. नेमतवाडी, ६. विटे, ७. व्होळे, ८. सुपली, ९. चिंचोली भोसे, १०. शेंडगेवाडी.
चौकट
अनुसूचित जाती महिला
१. नारायण चिंचोली. २. अजनसोंड, ३ . भाळवणी, ४. बोहाळी, ५. धोंडेवाडी, ६. आढीव, ७. करोळे, ८. खर्डी, ९. गार्डी, १०. उपरी.
चौकट
अनुसूचित जमाती महिला : १. सांगवी / बालकोट
अनुसूचित जमाती : १. वाखरी, २. अजोती
चौकट
सर्वसाधारण महिला
१. खरसोळी, २. पळशी, ३. चळे, ४. ईश्वरवठार, ५. फुलचिंचोली, ६. तारापूर, ७. गुरसाळे, ८. टाकळी, ९. अनवली, १०. कोर्टी, ११. पटवर्धन कुरोली, १२. नांदोरे, १३. पुळूज, १४. करकंब, १५. कान्हापुरी, १६.. शिरगाव, १७. गोपाळपूर, १८. शेळवे, १९. देवडे, २०. खरातवाडी, २१. जाधववाडी, २२. लोणारवाडी, २३. सुगांव खुर्द.
चौकट
ना.मा.प्र. :-
१. आव्हे तरटगांव, २. उंबरगाव, ३. भटुंबरे, ४. शिरढोण, ५. शेवते, ६. कोंढारकी, ७. तिसंगी, ८. तुंगत, ९. शेटफळ, १०. सिध्देवाडी / तरटगांव कासेगांव, ११. रांझणी, १२. पुळूजवाडी, १३. चिंचणी.
चौकट
ना.मा.प्र. महिला :-
१. मेंढापूर, २. सुस्ते, ३. आंबेचिंचोली, ४. सोनके, ५. बार्डी, ६. मुंढेवाडी, ७. पोहोरगांव, ८. तावशी, ९. सरकोली, १०. खेडभाळवणी, ११. वाडीकुरोली, १२. भोसे, १३. उजनी वसाहत..
0 Comments