Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळ : आरक्षण सोडतीला भावी इच्छुक सरपंचांनी केली गर्दी

 मोहोळ : आरक्षण सोडतीला भावी इच्छुक सरपंचांनी केली गर्दी

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-  मोहोळ तालुक्यातील २०२५ ते २०३० या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत प्रक्रिया मंगळवार, दि. १५ जुलै रोजी तहसील कार्यालय आवारामध्ये पार पडली. यामध्ये अनुसूचित जातीसाठी १३, अनुसूची जमाती १, नागरिकांचा मागास प्रवर्ग २४, सर्वसाधारण ५२ असे एकूण ९० ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्राधिकृत अधिकारी तहसीलदार सचिन मुळीक यांनी जाहीर केली.


दरम्यान, भावी इच्छुक सरपंचांनी आरक्षण सोडतीप्रसंगी गर्दी केली होती, मात्र ऐच्छिक आरक्षण न पडल्याने अनेकांचा हिरमोड होऊन गाव पुढारी माघारी फिरल्याने 'कही खुशी तर कही गम' असे चित्र पहावयास मिळाले.


मोहोळ तालुक्यातील ९० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया पंचायत समितीच्या सभागृहामध्ये मंगळवारी सकाळी १२ वाजता तहसीलदार सचिन मुळीक, नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे, निवासी नायब तहसीलदार संदेश भोसले, निवडणूक नायब तहसीलदार अनिल शहापुरे, सी.बी. आचलारे यांच्यासह मंडलाधिकारी त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली. दरम्यान आरक्षणा संदर्भात तेच आरक्षण पुन्हा पडल्याने उपस्थित ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांनी शंका उपस्थित केल्या होत्या. तहसीलदार मुळीक यांनी सर्व शंकांचे निरसन केले. दरम्यान, आरक्षण चिठ्ठी सावी समाधान क्षिरसागर या चिमुकलीने काढल्या.


मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण पुढीलप्रमाणे अनुसूचित जाती - महिला ( गावे - ६ ) :


जामगाव (बु), सारोळे, विरवडे खुर्द, मनगोळी/भैरववाडी, भोयरे, बैरागवाडी. अनुसूचित जाती- सर्वसाधारण (गावे - ७) : लांबोटी, शिरापूर मो, तेलंगवाडी, कुरणवाडी (आष्टी), वडाचीवाडी, मुंढेवाडी, सिद्धेवाडी. अनूसूचित जमाती महिला ( गावे- १) : परमेश्वर पिंपरी, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - ( गावे -१२) : वाफळे, येणकी, आष्टी, जामगाव खुर्द, पेनूर, बोपले, रामहिंगणी, खंडाळी, मिरी, कोथाळे, टाकळी सिकंदर, कोरवली. नागरिकांचा मागास प्रवर्ग- सर्वसाधारण (गावे -१२) : भांबेवाडी, सोहाळे,

नांदगाव, वडदेगाव, नजीक पिंपरी, हिवरे, दादपूर, वरकुटे, अर्जुनसोंड, येवती, सौंदणे, कामती बुद्रुक. सर्वसाधारण महिला (गावे-२६): अर्धनारी, घाटणे, आढेगाव, कुरुल, सय्यद वरवडे, हिंगणी निपाणी, कातेवाडी, देगाव वा, सावळेश्वर, अंकोली, एकुरके, डिकसळ, शिंगोली/तरटगाव, चिखली, वडवळ, मसले चौधरी, मलिकपेठ/दाइंगडेवाडीबिटले, पोफळी, पीरटाकळी, पापरी, नरखेड, पाटकुल, देवडी, कोन्हेरी, लमाणतांडा. सर्वसाधारण प्रवर्ग गावे - २६) : गोटेवाडी, पोखरापूर, मोरवंची, विरवडे बुद्रुक, औंढी, आष्टे, कामती खुर्द, घोडेश्वर, इंचगाव, खुनेश्वर, वाघोली/वाघोलीवाडी, शेजबाभुळगाव, गलंदवाडी/पासलेवाडी, वटवटे, तांबोळे, शेटफळ, आरबळी, शिरापूर सो, ढोक बाभुळगाव, यल्लमवाडी, यावली, चिंचोली काटी, हराळवाडी, खवणी, वाळूज, कोळेगाव.


चौकट  

१७ ठिकाणी बदलले आरक्षण

यापूर्वी मंगळवार, दि.२२ एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या आरक्षणामध्ये अरबळी, आढेगाव, आष्टी, कातेवाडी, कामती खुर्द, कुरुल, कोथाळे, खंडाळी, चिखली, नरखेड, बोपले, भांबेवाडी, यावली, वरकुटे, वाफळे, सय्यद वरवडे, सोहाळे अशा १७ ठिकाणच्या आरक्षण बदल झाले आहेत.


Reactions

Post a Comment

0 Comments