उत्तर सोलापूर : ३६ गावांसाठी होती उत्सुकता
उत्तर सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हाधिकारी यांच्या दि.८ जुलै २०२५ रोजीच्या आदेशान्वये उत्तर सोलापूर तालुक्यातील सन २०२५ ते सन २०३० या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच/उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ मध्ये सरपंच पदाच्या आरक्षणाबाबत तरतुदी निश्चित केल्या आहेत. सदर नियमान्वये नियम २ अ मध्ये नेमून दिल्यानुसार सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आली.
उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडतीचा कार्यक्रम मंगळवार, दि. १५ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ वाजता श्री. शिवछत्रपती सभागृह रंगभवन, सोलापूर येथे उत्तरचे तहसीलदार निलेश पाटील, नायब तहसीलदार चंद्रकांत हिंगमिरे, उत्तरचे गटविकास अधिकारी राजाराम भोंग यांच्या उपस्थितीत तालुक्यातील ३६ गावातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. उत्तर सोलापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक सरपंच पदाचे आरक्षण सोडतवेळी चिट्टी काढण्यासाठी हरीभाई देवकरण प्रशालेतील सहावीतील विद्यार्थी मयुरेश दिघे हा ही उपस्थित होता. यावेळी उत्तर तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
आरक्षण सोडत याप्रमाणे
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी ६ गावे : भागाईवाडी, राळेरास, तेलगाव (महिला), खेड, एखरुक/ तरटगाव, राळेरास (सर्वसाधारण). अनुसूचित जमाती प्रवर्ग साठी : मार्डी (महिला), नागरिकांचा मागास प्रवर्ग १० गावे : पडसाळी, कवठे, कारंबा, कळमण, बाणेगाव (महिला), रानमसले, पाथरी, नान्नज, वांगी (सर्वसाधारण), सर्वसाधारण प्रवर्ग १९ गावे : महिलांसाठी हिरज, पाकणी, वडाळा, तळेहिप्परगा, हगलूर, गुळवंची, तिऱ्हे, बी. बी. दारफळ, गावडी दारफळ, नरोटवाडी, सर्वसाधारणसाठी नंदुर/ समशापूर, डोणगाव / भाटेवाडी, बेलाटी, होनसळ, कौठाळी, सेवालालनगर, शिवणी, साखरेवाडी, कोंडी या गावांचा समावेश आहे.
0 Comments