जिल्हा परिषदेत "ई टपाल सेवा" केंद्र सुरू...!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये भ्रष्टाचार आणि करणारे आणि काम न करणारे कामचोर मोठ्या प्रमाणात वाढू लागल्यामुळे या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना ब्रेक लावण्यासाठीच ई टपाल सेवा केंद्र सुरू करण्यात आले असून सध्या जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण सामान्य प्रशासनाने बांधकाम या विभागातही टपाल सेवा सुरू झाली असून येत्या काही महिन्यातच सर्व विभागाचे कामकाज ई टपाल द्वारे जोडण्यात येणार असून यामुळे जिल्हा परिषदेतील कामकाज पारदर्शक आणि स्वच्छ होण्यास मदत होणार असून कामात गतिमानता वाढवण्यासाठी सुद्धा या प्रणालीला उपयोगात आणता येणार आहे. आजवर अनेक फाईल हा धुळखात पडत होत्या आणि टेबलाखालून हात गरम झाल्याशिवाय त्यांना हात लागत नव्हता परंतु या ई टपाल सेवेमुळे अनेक फाईलला सहजच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा हात लागेल कारण सर्व रेकॉर्डिंग कॅमेरासमोर होणार असल्यामुळे पेंडिंग फाईल आता पडणार नसल्याचे बोलले जात आहे. योग्य वेळेत अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना फाईलचा निपटारा करावा लागणार असून कोणती फाईल कुठे आहे हे लगेच समजणार असल्यामुळे आता कामात हाय गयी चालणार नसल्याची कुजबुज अधिकाऱ्यांमध्येच होताना दिसत आहे.
0 Comments