सावळेश्वर येथे आरक्षणासाठी मराठा बांधवांचे दोन दिवसीय साखळी
उपोषण..!
12 ऑक्टोबरला सरकारच्या विरोधात मुंडन आंदोलन....!!
सावळेश्वर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी मधूनच 50% आरक्षण 24 ऑक्टोबर च्या आधी सरकारने द्यावे. या मागणीसाठी मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर पंचक्रोशीतील विरवडे खुर्द आणि पांडव पोफळी येथील मराठा बांधवांच्या वतीने दोन दिवशी येऊन साखळी उपोषण आले आहे. अंतरवाली सराटी या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करणारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांच्या वेदना जाणून घेत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आजवर अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या असून अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली असून या सर्वांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये म्हणून आता नाही तर कधीच नाही. "अभी नही तो कभी नही "अशा प्रकारचा नारा देत आरक्षणाची ही शेवटची लढाई असल्याचे मनोज जरांगे पाटील हे सांगत असून सरकार ने आता वेळ न लावता मराठा समाजाच्या वेदना लक्षात घेऊन ताबडतोब आरक्षण जाहीर करावे .आणि ओबीसीच्या नेत्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी बोलू नये. अशा प्रकारची विनंती ते करताना दिसत आहेत. शनिवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाज बांधवांची भव्य आणि दिव्य अशी प्रकारची जाहीर सभा होणार असून या सभेला सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील करतायेत. स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अहोरात्र झटणाऱ्या या योध्याला संपूर्ण पाठिंबा देण्यासाठीच सावळेश्वर येथे मराठा समाज बांधव एकवटलाअसून सरकारच्या विरोधात मुंडन आंदोलन सुद्धा करणार आहे. या साखळी उपोषणामध्ये सर्वप्रथम सुधीर निळ, दादा हावळे, महेश सुरवसे, उमा तरटे , ज्येष्ठ नागरिक सरुबाई अंबुरे, उमेश माने, राहुल निळ हे मराठा समाज बांधव आघाडीवर असून यांच्यासह इतर अनेक बांधव या साखळी उपोषणामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने देण्यात आली.
0 Comments