अकलूज जुने बस स्थानकात स्वच्छ्ता अभियान संपन्न
अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलित , सदाशिवराव माने विद्यालय अकलूज , ज्युनिअर विभागांतर्गत मंगळवार दिनांक 10/10/2023 रोजी राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तर नियमीत कार्यक्रम अंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले .यासाठी अकलूजचे जुने बस स्थानकचा परिसर निवडण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी आगार व्यवस्थापक प्रमोद शिंदे, विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले,ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य संजय शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आगार व्यवस्थापक प्रमोद शिंदे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व समजून सांगत सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच मुख्याध्यापक फुले स्वच्छते बद्दलची व वेळेचे नियोजन कसे करावे या बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.त्यानंतर अकलूज जुने बस स्थानक परिसराची स्वच्छता विद्यार्थ्यांनी स्वतःहून केली. यामध्ये मंदिर परिसर, वर्क शॉपच्या मागील परिसर,बस स्थानक समोरील परिसर स्वच्छ आणि सुंदर केला. सदरचा उपक्रम विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल फुले, उपप्राचार्य संजय शिंदे यांच्या सूचनेनुसार व सहकार्यामुळे यशस्वी पार पडला . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ कर्मचारी महादेव सरवदे, वाहतूक निरीक्षक केतन सोनवलकर, वाहतूक नियंत्रक विजय रणदिवे, संतोष शिंदे,विजय लंगोटे, वरिष्ठ लिपिक उदय दुपडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी संग्रामसिंह भांगे व सहकार्यक्रम अधिकारी संजय जाधव,उमेश भिंगे, लहू एकतपुरे, अविनाश जाधव यांनी परिश्रम घेतले.
0 Comments