Hot Posts

6/recent/ticker-posts

लायन्स व एस के फाउंडेशनचे वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

 लायन्स व एस के फाउंडेशनचे वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- येथील एस.के.सोशल फाऊंडेशन व लायन्स क्लब सोलापूर सेंट्रल च्या वतीने  महात्मा गांधी व लाल बहादूर शास्री जयंती सेवा सप्ताहात कुचन प्रशालेतील इयत्ता दहावी विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त तथा एस.के.फाऊंडेशनचे अध्यक्ष लायन. अँड.श्रीनिवास कटकूर यांचे अध्यक्षते खाली आणि  लायन्स क्लब जुळे सोलापूरचे अध्यक्ष रविकिरण वायचळ यांचे हस्ते आणि लायन्स क्लब सोलापूर सेंट्रल अध्यक्ष आझम शेख, सचिव सी.ए.चंद्रकांत रच्चा, एस.के. फाऊंडेशनचे सचिव यशवंत इंदापुरे,ला.विठ्ठल सारंगी, ला.चक्रधर अन्नलदास, फँमिली प्लँनिंगचे मँनेंजर सुगतरत्न  गायकवाड , प्राचार्य युवराज मेटे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

प्रथम सरस्वती व महात्मा गांधी प्रतिमा पुजन मान्यवरांचे शुभहस्ते करण्यांत आले. त्यानंतर प्राचार्य युवराज मेटे यांनी सर्व पाहूण्यांचे स्वागत केले. अध्यक्ष आझम शेख यांनी प्रस्तावनेत लायन्स क्लबची माहिती दिली. यावेळी माजी प्रांतपाल अरविंद कोणसिरसगि यांनी मार्गदर्शन केले. तसेच सुगत गायकवाड यांनी विदयार्थ्यांनी मोबाईल पासून आतापासून दूर राहावे असे सुचविले. यावेळी सर्व मान्यवरांचे प्रशालेकडून बुके देऊन सत्कार केले. सत्कारानंतर सर्व विदयार्थ्यांना लेखनपॅड व पेन मान्यवरांचे हस्ते देण्यांत आले.  अँड.श्रीनिवास कटकूर  यांनी अध्यक्षीय भाषणांत  विदयार्थ्यांनी  आता पासून  जिद्द बाळगून, नियोजन करून  मेहनतीने अभ्यास केल्यास उत्तुंग यश निश्चित मिळेल असे सांगितले. या कार्यक्रमांस उपमुख्याध्यापक धर्मसाळेसर, पर्यवेक्षिका प्रणिता सामल,  पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, मल्लिकार्जून जोकारे, अनेक शिक्षक ,सेवक, विदयार्थ्यी विदयार्थ्यीनी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होणेसाठी सचिव चंद्रकांत रच्चा, गायकवाड , बोनाकृती आदींनी परीश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निर्मला शिंदे यांनी केले तर आभार यशवंत इंदापुरे यांनी मांडले.
Reactions

Post a Comment

0 Comments