बेवारस स्थितीत सापडलेल्या बालकांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, October 11, 2023

बेवारस स्थितीत सापडलेल्या बालकांसाठी संपर्क साधण्याचे आवाहन

 बेवारस स्थितीत सापडलेल्या बालकांसाठी

संपर्क साधण्याचे आवाहन


*30 दिवसाच्या आत पाखर संकुल बालगृह जुळे सोलापुर-413004 किंवा


 जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे( 7219104503) यांच्याशी


 संपर्क साधावा


 

सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-   आर्यन (बाल कल्याण समिती यांनी ठेवलेले नाव)  बाळ पंढरपुर ते टेंभुर्णी रोडवर बेवारस सापडले आहे.  करकंब पोलिस ठाणे,सोलापुर यांचे मार्फत बाल कल्याण समिती सोलापूर यांचे आदेशाने दि. 27 मे 2023 रोजी पाखर संकुल बालगृह सोलापुर या संस्थेत दाखल करण्यात आले आहे.




                तसेच प्रार्थना संदीप यादव उर्फ नित्या ही बालिका चिंचोली एमआयडीसी ता. मोहोळ या परिसरात विनापालक सापडली असुन मोहोळ पोलीस स्टेशन यांचेमार्फत बाल कल्याण समिती सोलापुर यांचे आदेशाने दि. 1 एप्रिल 2023 रोजी पाखर संकुल बालगृह सोलापुर या संस्थेत दाखल करण्यात आले असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोलापूर यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

                तरी बाळाच्या पालकांना व नातेवाईकांना आवाहन करण्यात येते कीही माहिती प्रसिद्ध झालेपासुन 30 दिवसाच्या आत पाखर संकुल बालगृह,लुंबीनी बंगला,आसरा ब्रिज जवळ, 54 वामन नगरजुळे सोलापुर-413004 किंवा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे संपर्क क्र. - 7219104503 किंवा बाल कल्याण समितीजिल्हा परिवीक्षा अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षणगृह/बालगृह, 937/9,नार्थ सदर बझार,सोलापूर यांचेशी संपर्क साधावाअसे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.   

 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages