Hot Posts

6/recent/ticker-posts

अनगर येथे मंजूर झालेले नवे दुय्यम निबंधक कार्यालय सुरु होईना शेतकरी आणि नागरिकांचे तहसीलसमोर चक्री उपोषण सुरू

 अनगर येथे मंजूर झालेले नवे दुय्यम निबंधक कार्यालय सुरु होईना

शेतकरी आणि नागरिकांचे तहसीलसमोर चक्री उपोषण सुरू



माहोळ (कटूसत्य वृत्त):- अनगर येथे महाराष्ट्र शासनाने नव्याने दुय्यम निबंधक कार्यालय मंजूर केले आहे. परंतु अद्यापही ते सुरु झाले नाही. त्यामुळे सदरचे दुय्यम निबंधक कार्यालय लवकरात लवकर सुरु करावे या मागणीसाठी मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिकांनी मोहोळचे नूतन तहसीलदार सचिन मुळीक यांना यांना निवेदन देऊन मोहोळ तहसील कार्यालयासमोर चक्री उपोषणास प्रारंभ केला आहे.  तालुक्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या मागणीनुसार राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी अनगर येथे दुसरे दुय्यम निबंधक कार्यालय मंजुर केले आहे.  याबाबत दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की मोहोळ तालुक्यातील शेत जमिनी आणि इतर मालमत्तांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार नोंद करण्यासाठी मोहोळ येथील दुय्यम निबंधक कार्यालय आहे. सदर कार्यालयात खरेदीखत, बक्षिसपत्र गहाणखत व इतर दस्तऐवज करणे करीता नेटवर्क प्रॉब्लेम य गर्दीमुळे नागरिकांना आठ ते दहा दिवस ताटकळत थांबावे लागत होते. त्यामुळे अनगर येथे नवीन दुय्यम निबंधक कार्यालय मंजुरी मिळाली आहे. येत्या काही दिवसात सदरचे कार्यालय सुरू न झाल्यास हे आंदोलन अशाच प्रकारे सुरू राहील असा इशारा यावेळी शेतकरी बांधवांनी महसूल प्रशासनास दिलेल्या निवेदनामध्ये दिला आहे. यावेळी महेश शेंडगे, रोहित जगताप, गणेश पाटील, पांडुरंग माळी, नितीन सोलनकर, बापू गायकवाड,अमोल राठोड, लक्ष्मण नरोटे, धुळा सरक, यश पासले, ऋत्विक पासले, आप्पा सरक, अभिजीत सरक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments