आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिकारी व
कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान
नाशिक (कटूसत्य वृत्त):- -महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान करण्यात आला. विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प., प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. एन. व्ही. कळसकर यांच्या हस्ते शालांत परीक्षा, पदवी व पदव्युत्त परीक्षेतील गुणवंत पाल्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे
विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचा विद्यापीठ परिवारातर्फे सन्मान करण्यात आला. याप्रसंगी इयत्ता दहाविच्या परीक्षेतील गुणवंत विद्याथी चि. आदित्य जितेंद्र शिरसाठ, चि. प्रेम जितेंद्र पवार, चि. सोहम योगेश आरोटे, चि. प्रथमेश मनोज कोतवाल यांचे तसेच उच्च माध्यमिक परीक्षेत चि. शनेशराजे संदीप कडू, कु. मयुरी शांताराम गायकवाड, कु. नेहा सुरेश शिंदे, चि. महेंद्र दिलीपसिंग राजपूत यांचा सन्मान करण्यात आला. पदवी परीक्षेत घवघवीत यश मिळविलेले चि. अथर्व राहूल विभांडिक, चि. आयुष विरेंद्र सोनार, चि. श्रीधर अनंत शिंदे, चि. जयवंत राजेश इस्ते यांचा तसेच पदव्युत्तर पदवी परीक्षेत चि. मिहिर मनोजकुमार मोरे यांचा सन्मान करण्यात आला.
विद्यापीठाच्या मा. कुलगुरु महोदया यांच्या हस्ते कु. तरन्नुम रजजान तांबोळी, चि. शुभम नंदुलाल सोनजे, कु. कोमल महेंद्र चौधरी, कु. नेत्रा विनोद व्यवहारे, चि. सार्थक महेंद्र बागुल, चि. दर्शन संदीप गांगुर्डे, कु. पायल दिपक गायकवाड, चि. तन्मय विलास केदार, कु. शिवानी तुकाराम सूर्यवंशी, चि. रोशन विष्णु काळुंगे, चि. प्रणव वाळू कसबे, कु. पायल त्र्यंबक कर्डक, चि. नचिकेत संजय सुराणा, चि. भावेश भगवंत गायकवाड यांना रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला.या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जनंसपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. विद्यापीठाच्या आस्थापना विभागाचे प्रमुख डॉ. नितीन कावेडे यांनी समन्वयन केले. विभागातील श्री. नंदकिशोर वाघ, श्री. राहूल विभांडीक, श्रीमती उज्वला पवार, श्री. सुरेश शिंदे यांनी याकरीता परिश्रम घेतले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, पाल्य, पालक आदी मोठया संख्येने उपसि्ित होते.
0 Comments