Hot Posts

6/recent/ticker-posts

शितलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते पदग्रहण सोहळा संपन्न

 शितलदेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते पदग्रहण सोहळा संपन्न




अकलूज (कटूसत्य वृत्त):- शिवरत्न शिक्षण संस्था संचलित शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश मीडियम स्कूल व शिवरत्न स्कूल येथे  शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सौ. शितलदेवी मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते दिमाखदार पद्धतीने पदग्रहण सोहळा पार पडला.
      दरवर्षी या शाळांमध्ये विद्यार्थी मंडळ निवडले जात असते. लोकशाही पद्धतीने मतदान करून स्कूल कॅप्टन,स्कूल व्हाईस कॅप्टन,स्पोर्ट कॅप्टन,हाऊस कॅप्टन,व्हाईस कॅप्टन,क्लब इन चार्जेस,व प्रिफेक्ट्स निवडले जातात. या सर्व विद्यार्थ्यांचा पदग्रहण समारंभ अतिशय उत्साहात नेहमीच साजरा केला जातो या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष  सौ.शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील,शिवरत्न शिक्षण संस्थेचे सचिव धर्मराज दगडे,राऊत सर,बनकर सर त्याचबरोबर अश्रफ सर,डॉक्टर मानसी इनामदार व इतर संचालक मंडळ उपस्थित होते.
         या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक अल्बर्ट थरकन व बिनो  पॉलोज  यांनी केले.  हजारिका रहमान यांनी देखील विद्यार्थ्यांना नेतृत्व व जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले.या कार्यक्रमा प्रसंगी बोलताना शितलदेवी मोहिते पाटील यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना नेतृत्व किती महत्त्वाचे आहे व उत्तम नेतृत्व देशाचे नेतृत्व करण्यासाठी कसे सक्षम बनू शकते या संदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांचा शपथविधी सोहळा पार पडला त्याचबरोबर शिक्षक परिचय व प्रतिज्ञा पार पडली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील विद्यार्थिनी राजलक्ष्मी गेंड व शाफिन सय्यद यांनी केले.व या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिवरत्न स्कूलचा कॅप्टन सोहम गादिया याने केले.

Reactions

Post a Comment

0 Comments