मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रा. फंडाच्या गायब झालेल्या रकमेचा शोध घ्या - दिलीप जाधव - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 16, 2023

मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रा. फंडाच्या गायब झालेल्या रकमेचा शोध घ्या - दिलीप जाधव

 मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रा. फंडाच्या गायब

 झालेल्या रकमेचा शोध घ्या - दिलीप जाधव

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-  मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी यांचे किमान वेतन अनुदान एप्रिल २०१८ पासून ऑनलाइन पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या स्वःताच्या बँक खात्यावर राज्य प्रकल्प संचालक पुणे यांच्याकडुन जमा केले जाते बँकेत जमा होणाऱ्या एकुण वेतनाच्या ८.३३ टक्के प्रा.फंड कर्मचारी हिस्सा कपात करून ही फंडाची रक्कम ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या संयुक्त नावाने काढलेल्या प्रा. फंड खात्यावर जमा केली जाते मोहोळ १७० ग्रामपंचायत कर्मचारी विविध पदावर काम करीत आहेत यापैकी ३० ते ४० कर्मचाऱ्यांची त्यांच्या वेतनातुन कपात करून घेतलेली लाखो रुपयांची प्रा.फंडाची रक्कम राज्य प्रकल्प संचालक राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान पुणे यांनी कर्मचाऱ्यांच्या खात्यावर पाठवली असल्याचे सांगितले जाते परंतु ही रक्कम प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही ही प्रा. फंडाची रक्कम गायब झाली असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला आहे तालुक्यातील फंडाच्या रकमा जमा होत नाहीत युनियनच्या वतीने शासनाकडे अनेकदा पाठपुरावा केला आहे तरीही या रकमेचा शोध लागत नाही म्हणुन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगर परिषद कामगार युनियनच्या वतीने मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने यांना युनियनचे राज्याध्यक्ष मोहन लामकाने जिल्हाध्यक्ष दिलीप जाधव जिल्हा सचिव बालाजी पवार यांनी शेळगाव येथे त्यांच्या निवासस्थानी समक्ष भेटुन निवेदन देण्यात आले व सविस्तर चर्चा करण्यात आली ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत प्रा.फंडाची खाती आहेत त्याच कर्मचाऱ्यांच्या तक्रारी फार मोठ्या प्रमाणात आहेत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे चौकशी केली असता अशा कोणत्याही रकमा आमच्याकडे जमा झालेल्या आहेत असे त्यांनी लेखी पत्राने कळविले आहे मग ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची रक्कम नेमकी कुठे गायब झाली आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे यावेळी महेश गुंड जमदाडे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages